ठाणे – भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांची नेमणूक करण्यात आली. वैद्य हे राज्यकर सह आयुक्त होते. यापूर्वी त्यांनी ठाणे महापालिकेत जकात विभागाचा कारभार पाहिला होता. तर महापालिकेचे सध्याचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्र काढण्यात येतील असे सर राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> संथगती विकास कामांवरील लक्ष वळविण्यासाठी भाजप-शिवसेनेची नाटके; मनसे आ. प्रमोद पाटील यांची टीका
महापालिकेचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांची वर्षभरापूर्वी भिवंडी महापालिकेच्या आयुक्त पदी नेमणूक झाली होती. म्हसाळ यांच्यापूर्वी आयुक्त असलेले सुधाकर देशमुख यांचीही अवघ्या दहा महिन्यात बदली करण्यात आली. भिवंडीत गोवर रूबेलाचा प्रादुर्भाव होत असताना म्हसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने उत्तम कामगिरी केली होती. त्यावेळी भिवंडी पॅटर्नची चर्चा झाली होती. नालेसफाईच्या संदर्भात त्यांनी ठेकेदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. ९ जूनला भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांची नेमणूक करण्याचे आदेश राज्यसरकारने काढले. वैद्य हे राज्य कर सह आयुक्तपदी होते. वैद्य यांनी यापूर्वी ठाणे महापालिकेत जकात विभागामध्ये उपायुक्त म्हणून काम केले होते. तर म्हसाळ यांच्या बदलीचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत. त्यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील असे राज्य सरकारने स्पष्ट केले.