ठाणे: वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी कल्याणमध्ये १४ ते १५ ऑक्टोबर रोजी सलग ३६ तास अखंड वाचन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते १५ ऑक्टोबरला रात्री ९ यावेळेत हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम बालकमंदिर येथे पार पडणार आहे.
अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान, बालक मंदिर संस्था आणि कल्याण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिवाचन सत्र, कथा वाचन, ललित वाचन, काव्य संमेलन, बालसाहित्य वाचन, महिलांचे काव्यसंमेलन, पत्रकारांचे अभिवाचन, भयकथा आणि आध्यात्मिक साहित्य वाचन अशा विविध सत्रात हे वाचन यज्ञ पार पडणार आहे.
हेही वाचा… मोदकोत्सव स्पर्धेत वैविध्यपुर्ण मोदकांची मेजवानी
उपक्रमात सहभागी होऊन सादरीकरण करणाऱ्या वाचकाला सहभाग प्रमाणपत्र आणि पुस्तक भेट देऊन सन्मानित केले जाणार आहे. हा उपक्रम विनामूल्य असून पुर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. या वाचन यज्ञात एक हजारहून अधिक वाचकांनी नोंदणी केली आहे. तसेच दहा हजारहून अधिक रसिकांनी सहभागाकरिता नाव नोंदवले आहे. अधिक माहितीसाठी ८७७९६४४९९२ या क्रमांकावर संपर्क साधावा.