डोंबिवली – अयोध्येतील राम मंदिरात पूजन केलेले अक्षतांनी भरलेले अक्षत कलश येथील श्री गणेश मंदिर संस्थानच्या गणेश मंदिरात आणण्यात आले आहेत. श्री गणेश मूर्तीसमोर हे चार अक्षत कलश भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. या कलशातील अक्षता पूजनानंतर भाविकांना देण्यात येणार आहेत.
विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अक्षत कलश विविध भागांत नेणे. भाविकांना त्याचे यथायोग्य दर्शन मिळणे आणि कलशातील अक्षता भाविकांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागांत हे कलश स्वयंसेवकाच्या माध्यमातून फिरविण्यात येत आहेत. काही भागांत हे कलश मंदिरात ठेवण्यात आले आहेत. डोंबिवलीतील गणेश मंदिरात संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त मंदार हळबे यांनी चार अक्षत कलश घेऊन आलेल्या स्वयंसेवकांचे स्वागत केले.
हेही वाचा – ठाणे शहरातील खुल्या व्यायामशाळांची दुरावस्था
अयोध्येतील राम मंदिरात पूजन केलेले अक्षत कलश डोंबिवलीत आल्याने भाविकांनी या कलशांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. स्वयंसेवकांच्या माध्यमातून या कलशातील अक्षता प्रत्येक घरी पोहोचतील यादृष्टीने नियोजन केले जात आहे. गणेश मंदिरातील कलश दर्शन आणि अक्षता वाटपाचा कार्यक्रम स्वयंसेवकांच्या सूचनेप्रमाणे सुरू केला जाईल, असे विश्वस्त प्रवीण दुधे यांनी सांगितले.