मुंबई महापालिकेकडून वाढीव पाणी मिळाल्यानंतर त्याचे कोपरी आणि वागळे इस्टेट परिसरात नियोजन करण्यात आले. असे असतानाही कोपरी भागात मात्र पाणी टंचाईची समस्या जाणवत असून कोपरीवासियांना गणेशोत्सवाच्या काळात पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे लागत असल्याचे चित्र आहे. तसेच अनेक इमारतींमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. या समस्येमुळे कोपरिवासीय हैराण झाले आहेत. दरम्यान या भागाला येत्या दोन ते तीन दिवसात वाढीव पाणी पुरवठा सुरू होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्त्याच्या ५६१ कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरीकरण झाले असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली आहे. महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांकडून दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठा अपुरा पडू लागला असून यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्षलीटर तर मुंबई महापालिकेकडे २० दशलक्षलीटर वाढीव पाणी देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून २० दशलक्षलीटर वाढीव पाणी ठाणे शहराला उपलब्ध झाले असून त्यासाठी पालिकेने जलवाहिन्या जोडणीची कामे तातडीने केली. या पाण्याचे कोपरी, आनंदनगर भागासाठी ६ दशलक्षलीटर, वागळे इस्टेट विभागासाठी ११ दशलक्षलीटर आणि किसननगर, भटवाडी भागासाठी ३ दशलक्षलीटर याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. असे असले तरी कोपरी भागात पाणी टंचाईची समस्या सुटलेली नसल्याचे दिसून येते. सिद्धार्थ नगर येथील बीएसयुपीच्या इमारतींसह, किशोर कुंज, त्याचबरोबर अन्य काही ठीकाणी आजही दिवसाला दोन ते तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीतील पाणी समस्या सोडविण्यासाठी कोपरीच्या वाढीव पाणी दिले आहे. मात्र, आजही अनेक भागात कमी दाबाने व अपुऱ्या प्रमाणत पाणी मिळत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने योग्य नियोजन करून कोपरीवासियांना पाण्याचा पुरवठा सुरु करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोपरी भागात वाढीव पाणी पुरवठा करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात या भागात पाणी पुरवठा सुरु होईल.– विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग,ठामपा.