Ambadas Danve : बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यातील महायुती सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक आधार नाही. तर पोलिसांनी आंदोलकांवर केलेला लाठीचार्ज योग्य नाही. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास केलेल्या विलंबाच्या निषेधार्थ हा जनक्षोभ होता. आंदोलकांची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि हे आंदोलन केवळ बदलापूरमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही उद्यापासून छेडणार, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बदलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर येथील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात तब्बल आठ ते नऊ तास रेल रोको आंदोलन केले. यानंतर अनेक मंत्र्यांनी यावेळी बदलापूर रेल्वे स्थानकात धाव घेतली. यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत महायुती सरकारवर निशाणा साधला. लहान मुलींवर अत्याचार झाल्यानंतर देखील धिम्या गतीने कारवाई झाली. यामुळे सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. पोलिसांना आंदोलकांवर लाठी चार्ज करण्याची गरज नव्हती. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास केलेल्या विलंबाच्या निषेधार्थ हा जनक्षोभ होता. आंदोलकांची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि हे आंदोलन केवळ बदलापूरमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही उद्यापासून छेडणार असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बदलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले.

हेही वाचा – पालकमंत्री शंभूराज देसाईंचे वराती मागून घोडे; स्थिती हाताबाहेर गेल्यावर चौकशीचे आदेश

हेही वाचा – अखेर बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांना हटवले, तब्बल दहा तासांनी रेल्वे मार्ग केला मोकळा

राजकीय उत्तर – प्रतिउत्तर

आंदोलकांमध्ये अनेक जण हे कोण होते, कुठून आले होते, याची काहीच कल्पना नाही. अनेक जणांच्या हातात लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले फलक होते. हे फलक अचानक कुठून आले. विरोधक जर हे अशा प्रकारचे घाणेरडं राजकारण करत असतील तर ते योग्य नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. तर आंदोलनात आलेले सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे आले होते. जर गिरीश महाजन यांना वाटत असेल की आंदोलक संशयास्पद आहेत तर त्यांनी करावी चौकशी, सरकार तुमचेच आहे, असे उत्तर अंबादास दानवे यांनी यावेळी दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambadas danve comment on badlapur school case says protests will be launched in maharashtra from tomorrow ssb