अंबरनाथः महिनोन महिने ज्या रस्त्यांवर, चौकांमध्ये असलेले लहान मोठे खड्डे, चुकीच्या कामामुळे पडलेले खाच खळगे यांवरून सर्वसामान्य निमुटपणे प्रवास करत असतो. मात्र एखादा मोठा नेता आला की तातडीने हे रस्ते दुरुस्त केले जातात. तशीच काहीशी परिस्थिती बुधवारी अंबरनाथमध्ये पहायला मिळत होती. अंबरनाथ शहरात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने सकाळपासूनच त्यांच्या मार्गातले अडथळे दूर केले जात होते. मटका चौक, उड्डाणपूल या भागात असलेले खड्डे डांबराने बुजवले जात होते. अनेक महिने या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक या तातडीच्या दुरुस्तीवर आश्चर्य व्यक्त करत होते.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक असल्याने सर्वच महत्वाचे नेते प्रचारासाठी सभा घेत आहेत. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासाठी बुधवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. अंबरनाथ पूर्वेतील बाह्यवळण रस्त्यावर ही सभा होईल. त्यासाठी पश्चिमेतील हेलिपॅडवर एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर उतरेल अशी शक्यता आहे. त्यामुळे त्या स्थळापासून सभास्थळापर्यंतचे रस्ते सुस्थितीत करण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच स्थानिक शासकीय यंत्रणांची धावपळ दिसत होती. शहरातील मटका चौक ते सभा स्थळापर्यंत जाण्यासाठीच्या रस्त्यावर भर चौकातच अनेक महिन्यांपासून खड्डे पडले होते. तर पुढे उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावरही खाचखळगे होते. त्यातून दररोज वाहनचालकांना त्रास सहन करत प्रवास करावा लागत होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या येण्यापूर्वी हे खड्डे भरण्यात आले.

Kishor Patkar latest marathi news
नवी मुंबई: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी किशोर पाटकर, बंडाच्या हंगामात पक्ष जोडणीचे आव्हान
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rituja Latke
ऋतुजा लटके यांना पुन्हा सहानुभूती मिळणार का ? पोटनिवडणुकीत हुकलेली लढत विधानसभेला होणार
Vidhan Sabha Elections, Elections Pune City,
विचार करण्याची हीच ती वेळ…
Uddhav Thackeray Buldhana, Buldhana meeting,
जिथून गद्दार आसामकडे पळाले त्या सुरतसह महाराष्ट्रात शिवरायांची मंदिरे उभारणार, बुलढाण्याच्या सभेत उद्धव ठाकरे गरजले
Deepak Kesarkar challenge increased due to rebellion from BJP
लक्षवेधी लढत: सावंतवाडी : बंडखोरीमुळे केसरकरांच्या आव्हानात वाढ
Eknath shinde late for rally
भंडारा: साडेतीन तास लोटूनही मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही, लोकांचा सभास्थळाहून काढता पाय
sharad pawar rally in hinganghat
प्रथमच असे घडणार ! शरद पवार यांच्या सभेत हिंगणघाटचे ‘शरद पवार’ गैरहजर राहणार

हेही वाचा – कळवा-मुंब्य्रात गुरु-शिष्याची नव्हे तर धर्म-अधर्माची लढाई, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे मुंब्य्रातील सभेत विधान

हेही वाचा – डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई

सकाळी सर्व यंत्रणा रस्त्यावर सक्रिय होती. त्यामुळे किमान मंत्र्यांच्या येण्यानेही का होईना रस्ते तर चांगले झाले अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य प्रवासी देत होते. याच कल्याण बदलापूर मार्गावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही बुधवारी प्रवास करणार आहेत. उल्हासनगरातील भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्यासाठी ते प्रचार सभा घेणार आहेत. त्यामुळे हा रस्ता कधी नव्हे ते सुस्थितीत आणण्यात येत होता.