अंबरनाथः मुरबाड आणि अंबरनाथ या विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मोठी नाराजी पाहायला मिळाली होती. मात्र त्याचा काहीही परिणाम मतदानात झाला नसल्याची बाब निकालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाराज निष्प्रभ ठरल्याची चर्चा रंगली आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध पक्षातीलच एक मोठा गट नाराज होता. तर मुरबाडमध्ये भाजप उमेदवाराविरुद्ध शिवसेनेतील बदलापुरातील महत्वाचा पदाधिकारी नाराज होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार किसन कथोरे पाचव्यांदा विजयी झाले. गेल्या विधानसभेच्या तुलनेत यांच्या मतांमध्ये १ हजार ४४१ मतांची वाढही झाली. गेल्या विधानसभेत कथोरे यांना १ लाख ७४ हजार ६८ मते होती. तर यंदा त्यांना १ लाख ७५ हजार ५०९ मते मिळाली. मात्र त्यांचे मताधिक्य घटले. कथोरे यांच्यापुढे भाजपातील एक मोठा नेता विरोधी काम करत असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीनंतर या नेत्यांने उघड बंड पुकारले होते. त्याचवेळी बदलापूर शहरातील शिवसेनेचा एक मोठा पदाधिकारीही किसन कथोरे यांच्या प्रचारात दिसला नाही. उलट महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करत असल्याच्या चर्चा बदलापूर शहरात रंगल्या होत्या. या सर्व परिस्थितीमुळे किसन कथोरे यांना धक्का बसेल अशी चर्चा होती. मात्र बदलापूर शहरातल्या जवळपास आठ मतदान केंद्र वगळता शहरातील इतर मतदान केंद्रांवर किसन कथोरे यांना मताधिक्यच दिसून आले आहे.
बदलापुरातील बेलवली, एरंजाड, खरवई, बदलापूर गाव या भागातल्या मतदान केंद्रांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुभाष पवार यांना तुलनेने अधिक मते मिळाली. तर नाराज भाजप नेत्याच्या समर्थकांचा वरचष्मा असलेल्या कल्याण तालुक्यातील अवघ्या चार ते सहा मतदान केंद्रांवर किसन कथोरे यांना कमी मते मिळाली. त्यामुळे या मतदान केंद्रांवर नाराज निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले आहे. मुरबाड तालुक्यातील सुमारे ८२ मतदान केंद्रांवर सुभाष पवार यांना अधिक मते मिळाली. यातील बहुतांश गावे सुभाष पवार यांचे वर्चस्व असलेली आहेत. मुरबाडच्या ५१८ मतदान केंद्रांपैकी १०० मतदान केंद्र वळगता इतर सर्वच मतदान केंद्रांवर कथोरे आघाडीवर होते.
हेही वाचा – कुणबी मतांच्या बेरजेमुळे दरोडांचा विजय
दुसरीकडे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेतील एक मोठा गट आमदार बालाजी किणीकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरेल अशी शक्यता होती. मात्र शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार असलेले राजेश वानखेडे यांचा प्रभाव असलेल्या उल्हासनगर महापालिकेतील सुभाष टेकडी परिसर आणि कुर्ला कॅम्प भागातील १५ मतदान केंद्रांवरच वानखेडे यांना आघाडी मिळाली. तर अंबरनाथ शहरातील पश्चिमेतील हाऊसिंग बोर्ड वसाहतीतील ५, खुंटवलीतील ३ यासह १६ मतदान केंद्रांवर किणीकर यांना कमी मते मिळाली. उर्वरित मतदान केंद्रांवर किणीकर आघाडीवर राहिले. ३३९ पैकी जवळपास ३१ मतदान केंद्र वगळता इतर ठिकाणी किणीकर आघाडीवर होते. त्यामुळे किणीकरांना १ लाख ११ हजार ३६८ मते मिळाली. अंबरनाथमध्येही किणीकर यांना धक्का देण्याच्या तयारीत असलेले पक्षांतर्गत नाराज निष्प्रभ ठरलेले आहेत.