राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान; वैयक्तिक शौचालय बांधणीत आघाडी
केंद्र सरकारसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या स्वच्छ भारत अभियानात अंबरनाथ नगरपरिषदेने राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमेत हागणदारीमुक्त आणि वैयक्तिक शौचालय बांधणीत अंबरनाथ नगरपरिषदेने बाजी मारली आहे. पहिल्या टप्प्यात १२४७ शौचालयांच्या बांधणीतून नगरपरिषद राज्यातील नगर परिषदांमध्ये अग्रस्थानी आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारी मुक्त शहरांच्या निर्मितीसाठी वैयक्तिक शौचालये बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेंतर्गत अशाच स्वरूपाची योजना हाती घेण्यात आली आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि महापालिकांमध्ये या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी असा आग्रह धरण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानाची शहरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या योजनेची अंमलबजावणी करताना अंबरनाथ नगरपरिषदेने ठरवलेल्या ११५५ शौचालयांच्या निर्मितीचे उद्दिष्ट पार करत असताना पहिल्या टप्प्यात १२४७ शौचालये उभारली. त्यामुळे राज्यात उद्दिष्टांपेक्षा अधिक शौचालये बांधून अग्रस्थानी येण्याचा मान मिळवला आहे. दिल्ली येथे नुकताच पार पडलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी ही योजना प्रभावीपणे राबविणाऱ्यांचे कौतुक केले. त्यात अंबरनाथ नगरपरिषदेचे आणि अधिकाऱ्यांचेही कौतुक करण्यात आले, तसेच कमी वेळेत आणि प्रभावीपणे केलेल्या कामाचा आदर्शही इतर शहरांसमोर यावेळी ठेवला.
‘स्वच्छ भारत अभियाना’त अंबरनाथची बाजी
स्वच्छ भारत अभियानात अंबरनाथ नगरपरिषदेने राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-05-2016 at 02:14 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath win swachh bharat abhiyan prize in maharashtra