जागेच्या वादातून महेश चौव्हान याने संतोष मदन पाटील यांच्या डोक्यावर बंदूक लावून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. सुदैवाने पाटील यांनी त्यांची सुटका करून घेतली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी महेशला अटक केली आहे.

हेही वाचा- डोंबिवलीकरांनो, आपली दुचाकी, चारचाकी वाहने सांभाळा मंगळवार पासून सुरू होत आहे टोईंग व्हॅन

कळवा येथील पारसिकनगर भागातील एका जागेवरून महेश चौव्हान (४०) आणि संतोष पाटील (४६) यांच्यामध्ये वाद होते. सुमारे १० दिवसांपूर्वी पाटील हे जागेची पाहाणी करत असताना महेश हा त्याच्या दोनसाथिदारांसह त्याठिकाणी आला. महेश आणि त्याच्या साथिदारांनी संतोष यांना शिवीगाळ तसेच मारहाण सुरू केली. त्यानंतर महेशने ‘जागेवरच गोळी घालीन’ असे म्हणत त्याच्या कमरेवर असलेला गावठी कट्टा बाहेर काढला आणि संतोष यांच्या डोक्यावर लावला. संतोष यांनी तात्काळ महेशचा हात झटकून स्वत:ची सुटका केली. सुदैवाने या घटनेत त्यांचा जीव वाचला. या घटनेप्रकरणी संतोष यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी महेशला अटक केली आहे.

Story img Loader