कल्याण- कल्याण मधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात शनिवारी रात्री एक महिला प्रसूत झाली. रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप झाला आहे. यामुळे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांंनी या प्रकरणाची अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.या चौकशीत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उध्दटपणा केला असेल. ते चौकशीत दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डाॅ. दांगडे यांनी दिला. रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रण यावेळी तपासले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण रेल्वे स्थानकावरील एक फिरस्ती महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्याने गस्तीवरील पोलिसांनी तिला तातडीने पालिकेच्या रेल्वे स्थानका जवळील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. तेथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना येथे पुरेसे कर्मचारी नाहीत. तुम्ही या महिलेला अन्यत्र न्या, अशी उत्तरे दिल्याची तक्रार आहे. या महिलेला कुठे न्यायचे, अशी चर्चा सुरू असतानाच रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात या महिलेची प्रसूती झाली. यामुळे पालिका प्रशासनाला नागरिक, काही राजकीय मंडळींंकडून लक्ष्य केले जात आहे.शनिवारी रात्री या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात ठिय्या मांडला होता. आमदार प्रमोद पाटील यांनीही या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाल्या शिवाय मनसे गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे.सोमवारी दुपारी मनसेच्या कल्याण मधील कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयात धडक मारुन दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An inquiry into the rukminibai hospital incident by the additional commissioner amy
Show comments