ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या पदाधिकारी मिनाक्षी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. सोमवारी शिंदे गटाच्या पदाधिकारी मिनाक्षी शिंदे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.