ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत केल्याप्रकरणी अनंत करमुसे यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून या प्रकरणाच्या तपास कामात करमुसे यांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. तसेच करमुसे यांनी स्वच्छ हेतूने याचिका दाखल केलेली नसल्याचे निरीक्षण नोंदवित त्यांची ट्वीट आणि फेसबुक पोस्ट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचेही उच्च न्यायालयाने यापुर्वीच नमूद केले आहे. यामुळे करमुसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, या संदर्भात अनंत करमुसे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, दोषारोपपत्राची कागदपत्रे अद्याप मिळालेली नसून त्यावर आता भाष्य करणे उचित ठरणार आहे. तसेच उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली होती, त्यासंदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा