एकीकडे बदलापूरसारख्या शहरातून बिलांची वसुली सर्वाधिक असल्याचे सांगत स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि दुसरीकडे अवघ्या पाचशे रुपयांच्या थकीत बिलासाठी गणेशोत्सवाच्या तोंडावरती वीज जोडणी तोडायची ही महावितरणाची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप वीज ग्राहकांमधून होतो आहे. गेल्या काही दिवसांपासून महावितरणाने सुरू केलेल्या कारवाईविरुद्ध नागरिकांमधून संताप व्यक्त होतो आहे. किमान गणेशोत्सवापुरता ही कारवाई थांबवण्याचे मागणी आता लोकप्रतिनिधींकडून होते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार घेणार ठाणे जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका ; सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार बैठका

बदलापूर शहरातील महावितरणाची वीज वितरण व्यवस्था जुनाट झाली आहे. त्यामुळे दिवसभरातून अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. एकही दिवस वीज पुरवठा खंडित होण्याशिवाय जात नाही. त्याचा परिणाम सर्वच गोष्टींवर होताना दिसतो. बदलापूर शहरात विजेमुळे पाणीपुरवठ्यालाही अडचणी येत आहे. बदलापूर पूर्व भागात वीज समस्या उग्ररूप धारण करते आहे. महावितरणाची व्यवस्था कुचकामी ठरत असल्याने ती सुधारण्याची मागणी सातत्याने होते. मात्र महावितरणाची वीज वितरण व्यवस्था सुधारताना दिसत नाही. सण उत्सवाच्या दिवशीही विजेचा लपंडाव सुरूच असतो. भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत असताना त्याच सुमारास बदलापुरातील बहुतांश भाग अंधारात होता. त्यामुळे महावितरणाविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महावितरणाने थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातल्या विविध भागांमध्ये थकीत बिल न भरलेल्या ग्राहकांचे मीटर तोडले जात आहेत. विशेष म्हणजे अवघ्या पाचशे रुपयांसाठी वीज जोडणी खंडित केली जात असल्याने नागरिकात संताप आहे. त्यातच सध्या गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग पाहायला मिळते आहे. शहरात गणेशोत्सवाची शंभर वर्षापेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. घरगुती गणेशोत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे नागरिक तयारी करत असताना अवघ्या पाचशे रुपयांच्या बिलांसाठीही वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महावितरणाच्या कारवाईविरुद्ध नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे.

हेही वाचा >>> वातानुकूलित लोकल फेऱ्यांविरोधात प्रवासी पुन्हा आक्रमक ; कळव्यातील बैठकीत आंदोलनाचा निर्धार

एकीकडे बदलापूर शहरातून सर्वाधिक बिलाची वसुली होते, असे सांगून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि दुसरीकडे सणाच्या तोंडावर नागरिक तयारीत व्यस्त असताना अवघे पाचशे रुपयांसाठी वीजपुरवठा तोडायचा, ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप तुषार साटपे यांनी केला आहे. आम्ही नागरिकांच्या वतीने महावितरणाच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही कारवाई किमान गणेशोत्सवापूरती थांबवण्याची मागणी केली आहे, अशी माहिती साटपे यांनी दिली आहे. गणेशोत्सवानंतर कारवाईत कुणाचाही अडथळा येणार नाही आणि नागरिक वीज बिलाचा नियमित भरणा करतील. त्यामुळे किमान गणेशोत्सवापूर्ती ही कारवाई थांबवावी अशी लेखी मागणी केल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी सांगितले आहे.