Anita Birje Anand Dighe Loyalist Joins Eknath Shinde led Party : शिवेसनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाच्या मेळाव्यानिमित्त शनिवारी (१० ऑगस्ट) ठाण्यात असतानाच त्यांच्या पक्षाला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्या, तसेच दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या सहकारी अनिता बिर्जे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “अनिता बिर्जे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल.”

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की “उबाठा गटाच्या उपनेत्या आणि आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी आज आनंदआश्रमात येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.”

Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवार युगेंद्र पवारांबद्दल बोलताना भावूक, डोळ्यांच्या कडा ओल्या, आवंढा गिळला अन् म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
mahavikas aghadi rebel
बंडखोरीला उधाण; तीन-तीन पक्षांच्या युती, आघाड्यांमुळे नाराजांची संख्या लक्षणीय
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
JNU plans Shivaji centre
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा अन् मराठा लष्करी इतिहास, JNU मध्ये आता विशेष केंद्र; कधी सुरू होणार अभ्यासक्रम

शिंदे यांनी म्हटलं आहे की “शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिता बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहोचवली होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त करतो.”

यावेळी ठाणे जिल्हा महिला संघटका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक रमाकांत मढवी, टेंभीनाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे तसेच ठाणे शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचा >> Amit Shah : “हर्षवर्धन नेहमी माझी कॉलर पकडून म्हणतो…”, अमित शाहांनी सांगितला किस्सा; म्हणाले, “हा तुमचा वकील…”

ठाण्यात ठाकरेंना आणखी एक धक्का, गडकरी रंगायतनबाहेर मनसेचा राडा

गडकरी रंगायतन या सभागृहात शनिवारी सायंकाळी ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी या मेळाव्यासाठी कार्यक्रमस्थळी दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील कारवर शेण व बांगड्या फेकल्या. त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यातील एका कारची काचही फोडली.

Story img Loader