ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या सहकारी आणि ठाकरे गटात उपनेते पदी असलेल्या अनिता बिर्जे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. शनिवारी उद्धव ठाकरे हे भगवा सप्ताह निमित्ताने ठाण्यात होते. त्याचवेळी दुसरीकडे अनिता बिर्जे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत टेंभीनाका येथे त्यांचा पक्ष प्रवेश झाला. आनंद दिघे यांच्यावर आधारित ‘धर्मवीर -मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातील त्यांचे पात्र गाजले होते. आनंद दिघे यांच्या हयातीत बिर्जे यांनी शिवसेनेच्या महिला आघाडीची धुरा सांभाळली होती. त्यामुळे आनंद दिघे हे त्यांना शिवसेनेच्या वाघीण म्हणत.

शिवसेनेच्या फुटीनंतर अनिता बिर्जे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची थेट उपनेते पदी निवड केली होती. आनंद दिघे हयात असताना बिर्जे या शिवसेनेच्या महिला आघाडीची धुरा सांभाळली होती. दोन वर्षांपूर्वी आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातही अनिता बिर्जे यांचे पक्षासाठीचे कार्य ठळकपणे दाखविण्यात आले होते. या चित्रपटात त्यांच्याविषयी एक संदर्भ दाखविण्यात आला आहे. दंगली दरम्यान, त्यांच्या घराला आग लावण्यात आली होती. त्यावेळी घरामध्ये त्यांचा मुलगा आणि त्या होत्या. आनंद दिघे हे स्वत: तेथे जातात आणि दंगलखोरांना पिटाळून लावतात. असे या चित्रपटात दाखविले होते. तसेच दिघे यांच्या काळात ठाण्यातील डान्स बार विरोधातील आंदोलनातही त्या होत्या. शिवसेनेचे नगरसेवक खोपकर यांच्या हत्येनंतर आनंद दिघे यांना अटक झाली होती. त्यावेळी ठाणे बंद पुकारण्यात आला होता. दिघे यांची सुटका व्हावी यासाठी शाळकरी मुले, महिला यांचे मोर्चे बिर्जे यांच्या नेतृत्त्वाखाली काढल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. दिघे हे त्यांना नेहमी शिवसेनेच्या वाघीण असे संबोधत असल्याचेही या चित्रपटात पाहायला मिळाले.

Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
ex-servicemen , nation building, Army Chief ,
माजी सैनिकांचा राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभाग शक्य; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे मत
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

हेही वाचा…अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर गुन्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. परंतु अनिता बिर्जे या उद्धव ठाकरे यांच्या सोबतच होत्या. अखेर शनिवारी उद्धव ठाकरे ठाण्यात असताना दुसरीकडे बिर्जे यांचा आनंद दिघे यांच्या आनंद मठात शिंदे गटात प्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे हेच दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत हे पटल्यामुळेच त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बिर्जे यांनी यावेळी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते पटल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या. बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे दिवंगत आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. बिर्जे यांच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल अशी अपेक्षा यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली.

Story img Loader