महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या फलकांवर छबी

इमारतीबाहेर पाणीपुरी विकणाऱ्या विक्रेत्याच्या तांब्यातील लघुशंकेचे किळसवाणे कृत्य लोकांसमोर आणून पाच वर्षांपूर्वी प्रकाशझोतात आलेली नौपाडय़ातील अंकिता राणे ही तरुणी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यातील मनसेच्या फलकांवर झळकू लागली आहे. फेरीवाल्याच्या किळसवाण्या कृत्याचे अंकिताने केलेले चित्रीकरण केवळ ठाणेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय ठरला होता. या घटनेनंतर प्रांतीय-परप्रांतीय असा राजकीय वादही पेटला होता. त्याच वादाला आता फोडणी देत मनसेने ठाण्यातील सेना-भाजपचा परंपरागत किल्ला असलेल्या नौपाडय़ात अंकिताचे फलक झळकावण्यास सुरुवात केली आहे.

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
premachi goshta after tejashri pradhan exit now this actress will play mukta role
तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’च्या सेटवर आली नवीन ‘मुक्ता’! शेअर केला स्क्रिप्टचा पहिला फोटो…

[jwplayer sHk0lrGQ]

ठाण्यातील नौपाडा परिसर शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या परिसरात वास्तव्य करणाऱ्या अंकिताने तिच्या इमारती बाहेरील रस्त्यावर पाणीपुरीवाल्याला लोटय़ात लघुशंका करताना पाहिले. या किळसवाण्या प्रकाराचे चित्रीकरण करून पाणीपुरीवाल्याचे बिंग फोडले. विविध माध्यमांतून ही चित्रफीत प्रसारित होताच राज्यभर खळबळ उडाली. त्याचा पुरेपूर फायदा उचलत मनसेने परप्रांतीयांविरोधातील आपल्या भूमिकेला पाश्र्वभूमी निर्माण केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील अंकिताची भेट घेऊन तिच्या धाडसाचे कौतुक केले होते. दुसरीकडे, भाजपचे तत्कालीन मुंबई शहर अध्यक्ष राज पुरोहित यांनी अंकिताबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे या मुद्दय़ाने चांगलाच पेट घेतला होता.

पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणानंतर आता अंकिता राणे पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. नौपाडय़ातील मनसेच्या विविध फलकांवर अंकिता राणेची छबी झळकू लागली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे नौपाडा परिसरातून अंकिताला उमेदवारी देईल, असे विश्वसनीय वृत्त आहे. शिवसेना आणि भाजप यांचा मतदारवर्ग मोठय़ा प्रमाणात असलेल्या नौपाडा परिसरात आपले आव्हान निर्माण करण्यासाठी मनसेने ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.

नौपाडा व पाचपाखाडी हा परिसर या शिवसेना व भाजप या पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा असून दोन्ही पक्षांची ताकद या परिसरांत मोठी आहे. अशा वेळी अंकिताच्या रूपात सर्वसामान्यांच्या कौतुकाचा विषय ठरलेल्या तरुणीला आपल्या पक्षातून उमेदवारी देऊन नौपाडय़ात स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. विधी शाखेची पदवीधर असलेल्या अंकिताला मनसेने नुकतेच उपाध्यक्षपद बहाल केले आहे. तरुण पिढीची राजकारणाला आवश्यकता असल्याने आपण मनसेचा झेंडा खांद्यावर घेतल्याचे अंकिताने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या प्रकरणी मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अंकिताला पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहे, असे सांगितले.

[jwplayer DDYIsSkX]

Story img Loader