लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे: नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागाकरिता वाढीव पाणी पुरवठ्याची घोषणा होऊनही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे येथील गृहसंकुलांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात ३० गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे समोर आले असतानाच, त्यापाठोपाठ आता आणखी २२ गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे पुढे आले आहे. या गृहसंकुलांना टँकरद्वारे पाणी पुरवठा घ्यावा लागत आहे. परंतु वाढत्या मागणीमुळे पाण्याचे टँकर मिळविण्यासाठी संकुलांतील रहिवाशांची वणवण करावी लागत असून त्यासाठी प्रती टँकरकरिता साडे तीन हजार ते सहा हजार रुपये खर्च करावे लागत आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतामार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे हा पाणी पुरवठा अपुरा पडत होता. त्यात वाढ करण्याची मागणी पालिका प्रशासनाने केली होती. त्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. यामुळे शहरात आता दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढीव पाण्याचे नियोजन विविध विभागात करण्यात आले असले तरी घोडबंदर भागासाठी घोषणा होऊनही पाणी पुरवठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे या भागातील संकुलांना पाणी टंचाईच्या झळा बसत असल्याची बाब समोर आली आहे. या भागातील ३० गृहसंकुलांमधील रहिवाशांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे पाणी टंचाईच्या समस्येची व्यथा मांडली होती. याच मुद्द्यावरून केळकर यांनी पालिका कारभारावर प्रश्न उपस्थित करत पाणी समस्येवर तोडगा काढण्याऐवजी महापालिका टँकरमाफियांना पोसत असल्याचा पुन्हा एकदा आरोप केला होता.
महापालिकेने नविन इमारतीना परवानगी देणे बंद केले पाहीजे, अशी मागणी करत येत्या दहा दिवसात पाण्याचे नियोजन केले नाहीतर स्वतः रस्त्यावर उतरून ठाणे महापालिकेवर लाँग मार्च काढू, असा इशारा त्यांनी दिला होता. यानंतरही पाणी पुरवठ्यात सुधारणा झालेली दिसून येत नसून या उलट आणखी २२ गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याची बाब पुढे आली आहे. या संकुलातील रहिवाशांनी भाजप आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे समस्या मांडल्या. महापालिकेने पाण्याचे न्याय वाटप केलेच पाहिजे आणि जर तसे होत नसेल तर प्रशासनाला कायद्याचा बडगा दाखवावा लागेल, असा इशारा दत्ता घाडगे यांनी यावेळी दिला. दरम्यान, महापालिका प्रशासनाबरोबर चर्चा करून लवकरच या प्रश्नावर तोडगा काढू असे आश्वासन आमदार डावखरे यांनी रहिवाशांना यावेळी दिले. याबैठकीला भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास दामले, तसेच फेडरेशन व गृहसंकुलांचे प्रतिनिधी, रहिवासी उपस्थित होते.
शहरात की वाळवंटात हेच कळेना
घोडबंदर येथील कावेसर भागातील कांचनपुष्प संकुल परिसरातील २२ संकुलांमधील नागरिकांना गेले वर्षभर दिवसातून अवघे पाच मिनिटे महापालिकेकडून पाणीपुरवठा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराला पाण्याचा पुरवठा वाढवून दिला जाईल असे आश्वासन देऊन आता सहा महिने झाले आहेत. तरीही ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रोडवरील अनेक संकुले पाण्याच्या टँकर वणवण करीत आहेत. शहरात आहोत की वाळवंटात आहोत हेच आता कळेनासे झाले आहे. अशी पाण्याची भीषण समस्या या परिसरात निर्माण झाली आहे, अशा प्रतिक्रीया नागरिकांनी डावखरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केल्या. या भागातील पाण्याच्या टँकरची इतकी मागणी वाढली आहे की सोसायटीमधील लोकांना पाण्याचा टँकर मिळण्यासाठी रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत जागावे लागत आहे. अशा तुटपुंज्या पाणी वितरणामुळे टँकरसाठी वर्षभरात प्रत्येक सोसायटीला लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला असुन, ठाणे महापालिका मात्र गृहसंकुलांकडून हजारो रुपये पाणीपट्टी करा द्वारे वसुल करत आहे, अशा संतप्त प्रतिक्रियाही नागरिकांनी व्यक्त केल्या.