लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगर : उल्हासनगरात झालेल्या हिंदू धर्मांतराच्या घटनेनंतर शनिवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. कैलास कॉलनी, समता नगर येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चात हिंदू धर्मांतराच्या घटनांविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
vikas kumbhare
भाजप आमदाराचा थेट काँग्रेस उमेदवाराला आशीर्वाद… मध्य नागपूरात…
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
BJP, Vanchit bahujan aghadi, Murtizapur constituency
मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितमध्ये लढा, राष्ट्रवादीला बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे
maharashtra vidhan sabha election 2024 shahapur assembly constituency sharad pawar ncp vs ajit pawar ncp
अजित पवारांचे दरोडा शिवसैनिकांना नकोसे
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित

काही महिन्यांपूर्वी कुर्ला कॅम्प येथे राहणाऱ्या कल्पना चौधरी यांची मुलगी दृष्टी चौधरी हिने धर्मांतर केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करत धर्मांतर केल्याचा आणि फूस लावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. त्यामुळे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दृष्टी चौधरी आणि सलीम चौधरी अशा दोघांना अटक केली होती. या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण होते. त्यामुळे या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शनिवारी उल्हासनगरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चापूर्वी आमदार नितेश राणे यांनी कल्पना चौधरी आणि त्यांच्या परिवाराची भेट घेऊन समतानगर परिसरातील धर्मांतर प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर उल्हासनगर तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

आणखी वाचा-बदलापुरात तीन वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतच अत्याचार; आरोपी अटकेत

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात हिंदू संघटनांनी धर्मांतरासंबंधी विविध मुद्द्यांवर कारवाईची मागणी केली. स्थानिक पोलीस आणि उल्हासनगर महानगरपालिका विशिष्ट समुदायाच्या बेकायदेशीर कारवायांवर कारवाई करण्यात उदासीन असल्याचा आरोप यावेळी राणे यांनी केला. अनेक बेकायदेशीर घरे भाड्याने देण्यात आली आहेत. जिथे अनधिकृतरित्या लोक राहतात. या भागातील हिंदू तरुणांचे आणि तरुणीचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे, असेही राणे म्हणाले. या प्रकरणाचा तपास आता दहशतवादी विरोधी पथकाकडे गेला असला तरी आम्ही आमच्या बहिणीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे राणे यावेळी म्हणाले.