बदलापूर येथील पूर्व भागात कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी काही ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई केली. मात्र या फेरीवाल्यांवर कारवाई करत असतानाच काही बड्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून उभारलेल्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सला या कारवाईतून वगळल्याने नगरपरिषदेच्या कारवाई बाबत सर्वत्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बदलापूर शहरातील खाद्य पदार्थाच्या गाडीवरील सिलिंडरचा स्फोट झाल्याने अनधिकृत पद्धतीने शहरात ठिकठिकाणी थाटण्यात आलेल्या फेरीवाल्यांच्या स्टॉल्सचा प्रश्न ऐरणीवर आला. यानंतर जागे झालेल्या कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बदलापूर पूर्व भागात स्टेशन ते कात्रप परिसरात कारवाई करून काही फेरीवाल्यांना तेथून हटविले. मात्र ही कारवाई करताना शहरातील घोरपडे चौकात एका मिठाईच्या दुकानासमोर थाटलेल्या सात ते आठ स्टॉलला या कारवाईतून वगळण्यात आले. यामुळे अतिक्रमण विभागाकडून कारवाईत दुजाभाव केला जात असल्याच्या सर्वत्र चर्चा रंगू लागल्या. यानंतर नगर परिषदेची ही कारवाई दुटप्पी असल्याचा आरोप फेरीवाला संघटनेचे निलेश येलवे यांनी केला. फेरीवाल्यांसह नगर परिषद कार्यालयात येऊन त्यांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे फेरीवाल्यांना फेरीवाला क्षेत्र उपलब्ध करून न देता कारवाई केल्यास मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Mumbai national park encroachment loksatta news
राष्ट्रीय उद्यान लुप्त होईल… अतिक्रमणांवर कारवाई न केल्यावरून उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १३७ शेड, १८ घरे जमीनदोस्त
Loksatta kutuhal Historic buildings Hard to find without stones
कुतूहल: पाषाणांशी जडले नाते…
Kalyan-Dombivli, Kalyan-Dombivli drivers ,
कल्याण-डोंबिवलीत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर कारवाई
Fast paced concreting on Madh Marve road in Malad is causing traffic congection
मढ मार्वे मार्गावरील रस्ते कामात नियोजनाचा अभाव, वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासाच्या प्रवासासाठी अडीच तास प्रतीक्षा
ganja addicts,Kalyan-Dombivli, ganja ,
कल्याण-डोंबिवलीत रात्री झाडांच्या आडोशाने बसणाऱ्या ८१ गांजा व्यसनींवर कारवाई

हेही वाचा >>>वाळू व्यावसायिकांच्या १८ लाखाच्या बोटी नष्ट; भिवंडीतील कशेळी, दिवे-अंजूर खाडीत महसुल विभागाची कारवाई

सद्यस्थितीत बदलापुरात शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत पद्धतीने फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. यामुळे नागरिकांना सातत्याने वाहतूक कोंडीला देखील सामोरे जावे लागते. तर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल्स किंवा हातगाड्यांवर हे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी शेगडी, गॅस सिलिंडरचा वापर केला जाती. कोणत्याही प्रकारच्या आग प्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्याने एखाद्या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या अशा स्टॉल्स किंवा हातगाडीला आग लागल्यास पुन्हा एकदा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

शहरात बेकायदेशीर फेरिवाले आणि उघड्यावरच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. तात्पुरती कारवाई करण्याऐवजी कायमस्वरूपी कारवाई करण्याकडे आमचे लक्ष आहे. सध्य़ा रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात कारवाई सुरू असून तो परिसर मोकळा करण्यात येतो आहे. लवकरच इतरत्र कारवाई केली जाईल. – मारूती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.

Story img Loader