ठाणे : महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता डाॅ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डाॅ. राकेश बारोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या सुसज्ज प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रिया विभागाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील डाॅक्टरांच्या वसतिगृहाची दुरावस्था असल्याची बाब मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आली होती. याशिवाय, तेथील महिला डाॅक्टरांनी या दुरावस्थेसह त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या तक्रारीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्या होत्या. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता डाॅ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, डाॅ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डाॅ. राकेश बारोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी काढला आहे.

हेही वाचा – ठाणे : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादनावर परिणाम, जांभूळही धोक्यात; फळबागा, भाजीपाल्यांचे नुकसान

हेही वाचा – कल्याणमध्ये फेरीवाल्याला लुटणारा तोतया पोलीस अटकेत

कोण आहेत डाॅ. बारोट?

डाॅ. राकेश बारोट हे नेत्र शल्यचिकीत्सक आहेत. ते गेली अनेक वर्षे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे रुग्णालयातील नेत्र विभागाची जबाबदारी होती. शिवाय, रुग्णालयात असलेल्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणूनही काम करीत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appointment of dr rakesh barot as chief health officer of thane mnc ssb