कल्याण- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद्र उर्फ नाना सूर्यवंशी यांची कल्याण डोंबिवली भाजप जिल्हा अध्यक्षपदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केली. राजकीय प्रवासाबरोबर नाना सूर्यवंशी हे कल्याणमधील सामाजिक, शैक्षणिक कार्यात आघाडीवर आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेतील माजी नगरसेवक वसंतराव सूर्यवंशी यांचे नाना सूर्यवंशी पुतणे आहेत. माजी मंत्री जगन्नाथ पाटील, घरातून काका वसंतराव यांच्या सहवासातून नाना यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. १९९५ पासून नाना सूर्यवंशी भाजपच्या कल्याण विभागात कार्यरत आहेत. पक्ष पातळीवर पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची वरिष्ठांनी दखल घेऊन यापूर्वी कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, युवा मोर्चा अध्यक्ष, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष, ठाणे विभाग सचिव अशा अनेक महत्वाच्या पदावर नाना यांनी यापूर्वी यशस्वीपणे काम केले आहे. कल्याण पूर्व भागात त्यांचे वास्तव्य आहे. या भागातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव, जरीमरी सेवा मंडळ, माॅडेल इंग्लिश शाळा, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघ अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी ते निगडित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कार्यकर्ते आहेत.

हेही वाचा >>>ठाण्यात चोवीस तासात २१४ मिमी पावसाची नोंद, यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस

हेही वाचा >>>ठाणे : भाईंदर रेल्वे स्थानकाजवळील जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला, तीनजण जखमी

मागील तीन वर्ष या पदावर डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते शशिकांत कांबळे कार्यरत होते. कांबळे यांना पुन्हा या पदावर ठेवण्याच्या हालचाली पक्षातील काही मंडळी करत होती. यामुळे निर्णयामुळे चुकीचा संदेश कार्यकर्त्यांत जाईल आणि नव्याने पुढे येत असलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होईल म्हणून नव्या दमाच्या युवा वर्गातील नरेंद्र सूर्यवंशी यांच्याकडे पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली असल्याचे समजते. पक्ष संघटना मजबुती, कार्यकर्त्यांच्या संघटनावर अधिक भर देणार आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

( नरेंद्र सूर्यवंशी.)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appointment of narendra suryavanshi as kalyan dombivli bjp district president amy