न्यास ट्रस्ट या संस्थेच्या वतीने अरण्यवाचन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी विज्ञान उपक्रमाचा एक भाग म्हणून न्यासतर्फे दरवर्षी हे शिबीर भरविले जाते. यंदाही ३० एप्रिल ते ६ मे या कालावधीत नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि ८ मे ते १४ मे या कालावधीत मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्प येथे अरण्यवाचन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिप्सीमधून फेरफटका मारून वन्यजीवांचे दर्शन घ्यायचे हा सर्वसामान्य पायंडा मोडून न्यासच्या वतीने भटकंती करताना जंगलवाटांवरील पगमार्क्स, खुरांचे ठसे, केस, ओरखडे, लेंडय़ा आणि इतरही अनेक जंगलखुणा व जनावरांचे कॉल्स यांचे निरीक्षण आणि त्यांचे अर्थ लावणे, तज्ज्ञांसोबत पक्षी, वनस्पती निरीक्षणाचा आनंद घेत अरण्यवाचनाचा आनंद विद्यार्थ्यांना येथे घेण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी ९८२०४२४८६७ किंवा ९८३३५८८४७५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
अरण्यवाचन शिबिराचे आयोजन
न्यास ट्रस्ट या संस्थेच्या वतीने अरण्यवाचन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी विज्ञान उपक्रमाचा एक भाग म्हणून न्यासतर्फे दरवर्षी हे शिबीर भरविले जाते.
First published on: 05-02-2015 at 01:01 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aranyawas study camp