लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: मागील दोन महिन्यांपासून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या दत्तनगर भागातील दोन अवजड कमानी डोंबिवली वाहतूक विभागाच्या पुढाकाराने बुधवारी ठेकेदाराने स्त्यावरून काढल्या. या कमानी काढून टाकाव्यात म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून येथील प्रवासी मागणी करत होते.

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
Thefts in Ramnagar Dombivli, Dombivli Thefts,
डोंबिवलीत रामनगरमध्ये एका रात्रीत सहा दुकानांमध्ये चोरी
butibori flyover latest marathi news
गडकरींच्या जिल्ह्यातील उड्डाण पूल खचला, एक किमी वाहनांच्या रांगा
illegal construction in Mahabaleshwar are demolish
महाबळेश्वर अवैद्य बांधकामावर हातोडा
unauthorized construction, Shri Gopal lal Mandir temple, Mira Road,
मिरा रोड येथे मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई

शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या प्रभागात या कमानी असल्याने आणि या कमानींवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रतीमा असल्याने पालिकेसह कोणीही अधिकारी या कमानी काढण्यासाठी धजावत नव्हता. ‘लोकसत्ता’ने या संदर्भातचे वृत्त बुधवारी प्रसिध्द करताच, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी कमानी काढणाऱ्या ठेकेदाराला सयंत्रासह दत्तनगर मध्ये बुधवारी बोलविले. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या अवजड कमानी काढून टाकण्याचे काम प्राधान्याने केले. कमानी काढताना वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता घेण्यात आली होती.

आणखी वाचा-ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

या कमानी रस्त्यावरून हटविल्याने वाहने या रस्त्यावरून आता सुसाट जाऊ लागली आहेत. दत्तनगर मध्ये मासळी बाजाराच्या ठिकाणी आणि दत्तनगर चौक येथे दोन्ही बाजुला पाच फुटाचा रस्ता अडवून या कमानी उभ्या करण्यात आल्या होत्या. या कमानी भागात दररोज सकाळी, संध्याकाळी वाहतूक कोंडी होत होती. याची जाणीव असुनही एक राजकीय पदाधिकारी आपली प्रतीमा सतत लोकांसमोर राहावी म्हणून या कमानी हटवित नव्हता, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Story img Loader