ठाणे : विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून आणि एका डेटिंग वेबसाईटच्या माध्यमातून महिला आणि पुरूषांची फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंब्रा पोलिसांच्या पथकाने अटक केली. जैद फुल खान (२४) आणि एजाज इम्तियाज अहमद (३२) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील एजाज हा फसवणूकीतून मिळालेल्या पैशांचा वापर भोजपूरी चित्रपटांच्या निर्मितीसाठी करत होता. या दोघांनी टोळी तयार करून ३० महिलांसह ८० जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मुंब्रा येथे फसवणूक झालेली महिला वास्तव्यास होती. विवाह करण्यासाठी तिने विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावर तिचे खाते बनविले होते. दुसरीकडे जैद आणि एजाज या दोघांनी एक बनावट खाते तयार करून तरुणीसोबत जवळीक वाढविली. त्यानंतर तिला विवाह करण्याचे अमीष दाखविले. तिचा विश्वास बसावा म्हणून जैद याने तिला व्हिडीओ काॅल देखील केला होता. जैद हा सलूनमध्ये काम करायचा. परंतु दिसायला देखणा असल्याने त्याचे समाजमाध्यमावर चाहते मोठ्याप्रमाणात होते. त्याने डायमंडचा हार पाठविल्याचे तरुणीला सांगितले. त्यानंतर तरुणीला डायमंडचा हार सीमा शुल्क विभागात अडकल्याचे सांगून तिच्याकडून १३ लाख ५४ हजार ९८१ रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी पिडीत तरुणीने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. उपायुक्त सुभाष बुरसे आणि साहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, संजय दवणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे, पोलीस उपनिरीक्षक विजय सानप यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

Gujarat man on FBI 10 Most Wanted Fugitives list
Crime News : FBIच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत गुजराती व्यक्तीचं नाव; माहिती देणाऱ्याला मिळणार ‘इतक्या’ डॉलर्सचं बक्षीस
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Investors in Dombivli cheated of 81 lakhs with false promise of 90 bungalow row house project
रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक
Two women who stole on the pretext of begging arrested in ulhasnagar crime news
उल्हासनगर: भिक्षा मागण्याच्या बहाण्याने चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे दोन महिलांना अटक
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
cybercrime digital arrest scam
Digital Arrest Scam: ‘डिजिटल अरेस्ट’ स्कॅमद्वारे देशभरात हजारो कोटींची लूट करणाऱ्या मास्टरमाईंडला अटक

हेही वाचा >>>डोंबिवलीत देवीचापाडा येथील जुगार, गांजाच्या अड्डयांमुळे नागरिक त्रस्त

ज्या बँक खात्यात त्यांनी महिलेकडून रक्कम घेतली होती. त्याचा बँक खात्याची माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, ९ जानेवारीला जैद याला पोलिसांनी मध्यप्रदेशातील भोपाळमधून अटक केली. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील मुख्य सुत्रधार एजाज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो उत्तरप्रदेशातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेशांतर करून त्याठिकाणी गेले. तिथे तो त्याच्या एका महागड्या मोटारीने त्याठिकाणी आला होता. पोलीस आल्याची चाहूल लागताच तो भरधाव वाहन चालवित तेथून पळ काढू लागला. सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत त्याचा चित्तथरारक पाठलाग करुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये ६२ हजाराचा गांजा, एमडी पावडर जप्त

अशी केली होती फसवणूक

– एजाज आणि जैद यांची ओळख त्यांच्या मैत्रिणीच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांनी सायबर फसवणूकीचे जाळे विणले. त्यांनी विवाह नोंदणी संकेतस्थळावर बनावट खाते तयार केले होते. या माध्यमातून दोघेजण महिलांची फसवणूक करत होते. त्यांनी आतापर्यंत ३० महिलांची फसवणूक केली आहे. भेटवस्तू सीमाशुल्क विभागात अडकल्याचे सांगून त्यांनी महिलांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केली आहे. तसेच एजाज याने उत्तरप्रदेशमधील लखनौ भागात काॅलसेंटर उघडले होते. या काॅलसेंटरमध्ये काही महिलांना कर्मचारी म्हणून काम करण्यास ठेवले. पुरुषांची फसवणूक करण्यासाठी त्यांनी क्झोझा नावाचे संकेतस्थळ सुरू केले होते. या संकेतस्थळावर नागरिकांना ‘हनीट्रॅप’मध्ये अडकविले जात होते. त्यांच्याशी अश्लील संभाषण, व्हिडीओ काॅल करुन फसवणूक केली जात होती. या संकेतस्थळाच्या माध्यमातून ५० पुरुषांची फसवणुूक झाली असावी असा अंदाज पोलिसांना आहे. त्यादिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

एजाज याने या सायबर गुन्ह्यामधून फसवणूक केलेली रकमेचा वापर भोजपरी चित्रपट निर्मितीसाठी केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने एक चित्रपटाची निर्मिती केली होती. तसेच तो दोन प्रसिद्ध गायकांच्या माध्यमातून एक गाणेही तयार करणार होता.

Story img Loader