ठाणे येथील भंडारआळी परिसरातील इमारतीमध्ये शुक्रवारी दुपारी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सचिन यादव (५५) याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे येथील भंडारआळी परिसरात पिडीत मुलगी राहते. ती इयत्ता सातवीत शिकते. सचिन हा देखील भंडारआळी परिसरात राहतो. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास परिसरातील इमारतीत सचिनने पीडित मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून सचिनला अटक केली, अशी माहिती ठाणेनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.