डोंबिवली – भावाला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी बुधवारी रात्री एका इसमाने हातात कुऱ्हाड घेऊन जुनी डोंबिवली भागात दहशत माजवली. रस्त्यांवरून येजा करणारे पादचारी, रिक्षा चालक, इतर वाहनांना हा इसम कुऱ्हाडीचा धाक दाखवत होता. त्याने एका रिक्षाची काच कुऱ्हाडीने फोडली. या प्रकाराची माहिती मिळताच  विष्णुनगर पोलिसांनी धाव घेऊन त्याला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किरण बाळू शिंगारे असे या इसमाचे नाव आहे. जुनी डोंबिवली भागात तीन ते चार तरूणांनी किरणच्या भावाला पूर्ववैमनस्यातून मारहाण केली होती. ही माहिती मिळताच भावाच्या मारहाणीचा बदला किरणने घेण्याचे ठरविले. त्याने बुधवारी रात्री हातात कुऱ्हाड घेतली. जुनी डोंबिवली भागातील विविध रस्त्यांवर कुऱ्हाड उंचावत तो फिरत होता. पादचाऱ्यांना तो कुऱ्हाडीचा धाक दाखवत होता. रिक्षा चालक, दुचाकी स्वारांच्या अंगावर कुुऱ्हाड घेऊन धावत होता. त्याने एका रिक्षाची काच कुऱ्हाडीने फोडली. एका दुचाकीची त्याने तोडफोड केली. बेभान झालेल्या किरणची माहिती स्थानिक नागरिकांनी विष्णुनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जुनी डोंबिवलीतील रस्त्यावरून किरणला अटक केली.