दहा वर्ष तुरुंगात काढून त्यानंतर बाहेर येऊनही सऱळमार्गी जीवन जगण्या ऐवजी मध्य प्रदेशातील एका ३२ वर्षाच्या तरुणाने कल्याण मधील एका नऊ वर्षाच्या बालिकेचे रात्रीच्या वेळेत पंधरा दिवसापूर्वी अपहरण केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केला होता. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनेच्या १५ दिवसानंतर बालिकेच्या मारेकऱ्याला पकडण्यात यश मिळविले आहे.
हेही वाचा>>>ठाणे: कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अस्वच्छता
कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानकासमोरील उच्चभ्रुंची वस्ती असलेल्या एका इमारतीच्या आवारात एका नऊ वर्षीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा धारदार हत्याराने खून करण्यात आला होता. या घटनेला १५ दिवस उलटून गेल्यानंतर महात्मा फुले चौक पोलिसांनी या मुलीच्या फरार असलेल्या मारेकऱ्याला शोधून काढण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे हा भुरटा यापूर्वी देखील बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा भोगून आला आहे. कारागृहातून सुटून आलेल्या नंतर त्याने अत्याचाराची पुनरावृत्ती सुरू केली होती.
हेही वाचा>>>ठाण्यात पुन्हा काही काळ वाहतूक कोंडी, यावेळी मुंबई पालिकेच्या वाहनाला अपघात झाल्याचे निमित्त…
मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी असलेला सूरज शंकर सिंग उर्फ विरेंद्र शंकर मिश्रा (३२) हा भिवंडी परिसरात राहत आहे. एका बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी त्याला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. ही शिक्षा भोगल्यानंतर सूरज उर्फ विरेंद्र याची गेल्या महिन्यात तुरूंगातून सुटका झाली होती. त्यानंतर सरळमार्गी आयुष्य जगायचे सोडून त्याने पुन्हा लैंगिक अत्याराचे प्रकार सुरू केले होते. मागील काही दिवसापूर्वी सूरजची नजर कल्याण मधील एका फिरसत्या अल्पवयीन मुलीवर पडली. त्याने रात्रीच्या वेळेत पदपथावर आपल्या वडिलांच्या सोबत झोपेत असलेल्या नऊ वर्षाच्या मुलीला उचलून कल्याण पश्चिमेकडे असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगाराजवळ न्यू मोनिका उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या इमारतीच्या आवारात आणले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची धारदार हत्याराने गळा चिरुन हत्या केली. मृत मुलगी आणि तिचा खून करणारा असे दोघेही फिरस्ते असल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले होते.
हेही वाचा>>>शिळफाटा मार्गावरील वाहतूक रात्री बंद
यासंदर्भात पोलिसांनी एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून सोडून दिले होते. मात्र तपासाचा वेग वाढल्यानंतर हे कृत्य करणारा कुणीतरी वेगळाच असल्याचा पोलिसांचा कयास होता. सीसीटीव्ही चित्रिकरणाचा आधार घेत पोलिसांनी सूरज उर्फ विरेंद्र सिंग याचा माग काढला. सूरज उर्फ विरेंद्र हा अशा प्रकरणात सराईत गुन्हेगार असल्याने त्यानेच या मुलीचा अत्याचार करून खून केल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांची वेगवेगळी दहा पथके त्याच्या मागावर होती.
सूरज त्याचे मूळ गाव असलेल्या मध्यप्रदेशात असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांनी एक पथक मध्यप्रदेशातही जाऊन आले. मात्र भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावात हा खूनी लपल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री पोलिसांनी या गावाला वेढा घातला. अखेर शोध मोहीम राबवून त्याला अटक केली.
सोनाळे गावात आरोपी सूरज यांने काही अनैसर्गिक अत्याचार करण्याचे प्रकार केले होते. ग्रामस्थांनी त्याला रंगेहाथ पकडून बेदम मारहाण केली होती.