ठाणे शहरातून अधिकाधिक कलाकार व खेळाडू निर्माण व्हावेत तसेच ठाणेकरांना विविध कलांचा अविष्कार तसेच खेळांचा थरार अनुभवता यावा, या उद्देशाने महापालिकेने यंदा कला व क्रीडा प्रकारांचे एकत्रित आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी शहरातील एखाद्या विशिष्ट प्रभागात हा महोत्सव आयोजित केला जात असे. तसेत कला आणि क्रिडा असे महोत्सवाचे वेगवेगळे भाग पाडले जात असत. त्यामुळे अन्य प्रभागातील नागरिकांना या महोत्सवांचा अस्वाद घेता येत नव्हता. यंदाच्या महोत्सवाच्या माध्यमातून महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती स्तरावर कला तसेच क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात येणार असून त्याच्या अंतिम फेऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात एकत्रित पार पडणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने शहरांमध्ये कला तसेच क्रीडा प्रकारांचे वातावरण निर्माण करण्याचा महापालिकेचा विचार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा