शालेय विद्यार्थिनींना समाजातील बऱ्यावाईटाची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न
आपल्या समाजात अनेक पुरोगामी बदल घडून आले असले तरी दुर्दैवाने स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू या दृष्टीने पाहणाऱ्यांची संख्या आजही लक्षणीय आहे. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणाहून जाणाऱ्या मुलींची छेडछाड, जाणूनबुजून स्पर्श करणे, बलात्कार, पाठलाग करणे अशा अनेक घृणास्पद घटना वारंवार उजेडात येत असतात. अशा गोष्टींचा अनुभव कोवळय़ा वयातच येत असल्याने शालेय विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेचे भयचक्र निर्माण होते. त्यातून येणारा न्यूनगंड आणि भीती अनेक मुलींच्या व्यावसायिक तसेच कौटुंबिक जीवनावर परिणाम घडवतात. हेच भयचक्र भेदण्यासाठी विरारमधील एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी कसोशीने प्रयत्न करीत आहे. ‘जाणीव’ या विषयावर शालेय विद्यार्थिनींना व्याख्यान देऊन चांगले आणि वाईट कसे ओळखायचे याचे प्रशिक्षणच ही तरुणी देत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विरारच्या विवा महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षांत शिकत असलेली आरती वाडेर (१९) हिने आजवर २९हून अधिक ठिकाणी व्याख्याने देऊन कोवळय़ा वयातील मुलींना सतर्क करण्यात यश मिळवले आहे. ‘महिला अत्याचाराच्या आणि फसवणुकीच्या बातम्या दररोज वाचनात यायच्या. त्यामुळे मनात भीेतीे आणि न्यूनगंड निर्माण झाला होता. विरारमध्ये यंग स्टार ट्रस्ट या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका पथनाटय़ात भाग घेतला आणि आत्मविश्वास मिळाला. आपल्याप्रमाणेच अन्य मुलींनाही जागृत करावे, असे ठरवले. त्यासाठी ट्रस्टचे आजीव पाटील आणि मिलिंद पोंक्षे यांची खूप मदत मिळाली,’ असे आरती सांगते. ‘जाणीव’ या उपक्रमाच्या माध्यमातून आरती शाळा आणि महाविद्यालयांत विनामूल्य व्याख्याने देते. या व्याख्यानात मुलींना विचार, संस्कार, भय, स्पर्श, प्रलोभने, वर्तणूक, व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा आठ मुद्दय़ांवर माहिती देण्यात येते. समाजात वावरताना अयोग्य स्पर्श कोणता, हे कसे ओळखावे, याची जाणीव त्यांना करून दिली जाते, असे आरती म्हणते.

‘मुलीे नको त्या गोष्टींना घाबरतात. दृश्य आणि अदृश्य स्वरूपाचे भय त्यांना सतावत असते. त्यांच्यात पटकन राग येण्याचा, इतरांना आकर्षित करून घेण्याचा व्यक्तिमत्त्वातीेल दोष असतो. तारुण्यात त्या पैसे, मोटारसायकली आणि इतर तत्सम प्रलोभनांना बळी पडतात. यातून बाहेर कसे पडायचे, याची माहिती मी देते,’ असे आरती सांगते. आपलीे आई हीच खरी मॅनेजमेंट गुरू आहे. तिला मैत्रीण मानायला हवं, असा सल्ला ती मुलींना देते. त्यांच्याच वयाची असल्याने मुली तिच्याशी पटकन संवाद साधतात.