आपले कपडे हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. आपण जे कपडे परिधान करतो, त्यावरुन बरेचदा आपल्याविषयी आणि आपल्या स्वभावाविषयी तर्कवितर्क लावले जातात. आपला सर्वाधिक वेळ हा ऑफिसमध्ये जातो. त्यामुळे जेव्हा ऑफिससाठी असणाऱ्या कपडय़ांचा विचार करता तेव्हा जाणीवपूर्वक कपडे निवडणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजकालच्या तरुणी आपण कसे दिसतो कसे वागतो आणि आपले ठसा समोरच्या व्यक्तीवर कसा पडतो यावर चिंतीत असतात. त्यातल्या त्यातही ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणीमध्ये जास्त उत्सुकता असते. ऑफिसात जाताना नीटनेटक दिसावे की फॅशनेबल हा प्रश्न अनेकींना पडतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा खरा ठसा हा पहिल्या भेटीतच उमटतो. म्हणूनच थोडसे फॅशनच्या बाबतीत सतर्क असणे वावगे ठरणार नाही. आपल्या व्यवसायिक आयुष्यात तर नक्कीच नाही. आपल्या समोर नेहमीच हा प्रश्न असतो की आपण ऑफिसला जाताना किंवा मुलाखतीला जाताना असे काय करावे जेणेकरून आपण चारचौघात उठून दिसू.

पोशाखाविषयी..

कुर्ता-लेगीन्स, सलवार-कमीज, साडी हे काही अतिशय साधे आणि नक्कीच कुठल्याही भारतीय स्त्रीला शोभून दिसणारे ‘फॉर्मल’ कपडे ठरतात. तर ‘वेस्टर्न फॉर्मल वेअर’ मध्ये ट्राउजर-शर्ट, स्कर्ट-शर्ट असे काही अत्यंत लोकप्रिय आणि आरामदायक कपडे उत्तम ठरतात. हायवेस्ट पेन्सिल स्कर्ट, पेप्लम स्कर्ट किंवा टय़ूलिप स्कर्ट हे स्कर्टचे काही वेगळे प्रकार फॉर्मल वेस्टर्न वेअरमध्ये अप्रतिम दिसतात. त्यावर तुम्ही फॉर्मल टॉप्स, फॉर्मल शर्टस किंवा फॉर्मल ब्लाऊज घालू शकता. जेव्हा आपण फॉर्मल वेअर बाबत बोलत असू तेंव्हा तुमच्या वॉडरोबमध्ये  ‘ब्लेझर’ असणे अगदी आवश्यक होऊन बसते. असे फॉर्मल ब्लेझर्स स्कर्ट, ट्राउझर, शॉर्ट ड्रेसेस किंवा अगदी जीन्सवर घातल्यानेही चांगलीच छाप पडते. फॉर्मल लूक सजवायला खरी मदत होते ती आभूषणांची हातात मेटल मधले गोल्ड, सिल्वर घडय़ाळ, सॉलिड कलर्स मधली स्लिंग किंवा टोटे हँडबॅग्ज आणि वेजेस, हिल्स किंवा अप्रतिम इम्प्रेशन असणारे फ्लॅट्स हे एक उत्तम समिकरण पेहरावाला कमालीची साथ देतात. कॉरपोरेट, मीडिया आणि बॅकिंग अशा अनेक क्षेत्रात कपडय़ांची वेगवेगळी बंधन असतात.

  • फॉर्मल जंपसुट्स- जंपसुट्स म्हणजे पॅण्ट आणि शर्टचा एकत्र अवतार आहे. यामध्ये पलाझो, पेन्सील बॉटम, नॅरो बॉटम पॅण्ट आणि त्यावर वैविध्यपुर्ण असे शर्ट यांचा एकत्रितपणे केलेला प्रयोग सध्या सर्वाधिक लोकप्रिय झाला आहे.
  • वेस्टर्न लाँग ड्रेस- हा ड्रेस गुडघ्या पर्यंत लांब असतो. शरिराच्या बांध्यानुसार घट्ट असतो. यामध्ये बाह्यांचे आणि बिनबाह्यांचे (स्लीव्हलेस) असेही प्रकार उपलब्ध आहेत. हे ड्रेस अत्यंत आरामदायी आणि आकर्षक असतात. यामध्ये दोन रंगांच्या संगतीच्या ड्रेसची अधिक चलती आहे.(उदा.ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट).
  •  ‘पेप्लम’- स्कर्ट आणि टॉपचा एकत्रित अवतार- पुर्वी स्कर्ट आणि शर्ट अशा दोन कपडय़ांचे समिकरण करुन एक उत्तम पेहराव तयार होत. काळानुरुप त्यामध्ये बदल होत गेले आणि या दोन्ही कपडय़ांचा एकत्रितपणे एक सुंदर असा फॉर्मल ड्रेसचा प्रकार बाजारात आला आहे.
  • पॅण्ट आणि शर्ट- पॅण्ट आणि शर्ट हे पारंपारिक फॉर्मल कपडे आहेत. कलांतराने पॅण्टचा आकारामध्ये आणि एकदंर प्रकारात बदल करण्यात आले आहेत. सध्या पेन्सील बॉटम ट्राउझर्ची चलती आहे. त्यावर लांब हाताचा शर्ट, मेगा स्लिवस् शर्ट, बलुन शर्ट आदी शर्टस्चे प्रकार वापरले जातात.
  • लेगिंग्ज आणि कुर्ती- चुडीदार लेगिंग्ज आणि त्यावर लांब हाताची फिकट रंगाची आकर्षक अशी कुर्ती घालण्याचा ट्रेण्ड आहे. ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरु लागला आहे. सर्वसामान्य घरापासून उच्चभ्रू घरांतील मुली ऑफिससाठी हा पर्याय अधिक निवडतात.

‘कॉपरेरेट लूक’ निवडताना

  • आपल्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच आपला आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव या गोष्टी दाखवणारा पेहराव निवडावा. हे करताना शक्यतो अंगप्रदर्शन करणे टाळावे.
  • बोट नेक आणि क्रुनेकचे कपडे परिधान केल्याने आपण ऑफिसमध्येही आकर्षक आणि सुंदर दिसाल.
  • डीप नेक कपडे वापरायचे असल्यास त्यावर श्रग, जॅकेटस् किंवा स्कार्फ घेऊ  शकता. ही संगती आकर्षक दिसण्यासोबतच सभ्यताही दर्शवते.
  • बालरिन्स, किटेन हिल्स आणि वेजेस यांसारखे आरामदायक आणि चांगले बुट कोणत्याही पोशाखावर शोभून दिसतात.
  • ऑफिसमध्ये फ्लिप-फ्लॉपचा वापर अजिबात करु नका.
  • कुठे : गावदेवी मार्केट, राम मारुती रोड, कोरम मॉल, विविआना मॉल