महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर एखादी उत्कृष्ट दर्जाची नोकरी करायची, त्यातून भरपूर प्रमाणात पैसा कमावायचा हे तरुणांचे स्वप्न असते. मात्र वाचनाची आवड असल्याने तरुणपणी एखादे ग्रंथालय स्थापन करावे, या ग्रंथालयात नियमित हजेरी लावून वाचकांना पुस्तके उपलब्ध करून द्यायची आणि ग्रंथालयाचा कारभार एखाद्या नोकरीसारखाच पेलायचा हे कौतुकास्पद असले तरी थोडे धाडसाचेच काम आहे. कल्याणमध्ये राहणारे विलास धारप हे गेली ३४ वर्षे रामबाग परिसरात वाचकांना आपल्या श्रीगणेश ग्रंथालयाच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करून देत आहेत. विलास धारप यांनी विज्ञान शाखेत आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले असले तरी नोकरी करायची त्यांची इच्छा नव्हती. विद्यार्थीदशेत असताना वाचनाची प्रचंड आवड असल्याने विलास धारप व त्यांची आई त्या काळात चार ग्रंथालयाचे सभासद होते. त्यावेळी रामबाग परिसरात उत्तम ग्रंथसंग्रह असलेले वाचनालय नव्हते. त्यामुळे स्वत:ची वाचनाची आवड आणि रामबाग परिसरातील नागरिकांना वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विलास धारप यांनी १९८१ मध्ये श्रीगणेश ग्रंथालयाची स्थापना केली. ग्रंथालय हीच आपली नोकरी असे मानून गणेश ग्रंथालयाच्या माध्यमातून नागरिकांना येथे ग्रंथसेवा पुरवली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा