रेणुका कला मंच, ठाणे
सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व आजही कायम आहे. रेणुका कलामंच ही अशीच एक ठाण्यातील पारंपरिक भजन, भारूड, गवळण हे लोकप्रकार सादर करणारी संस्था. आधुनिक काळात या आपल्या मातीतील लोककलांचा नव्या पिढीला परिचय करून देण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. रेणुका कला मंचने भारतभर या महाराष्ट्रीय कला नेल्याच, पण परदेशातही भारतीय लोककला पोहोचवली. या संस्थेच्या वाटचालीचा हा आढावा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कथा, काव्य यांच्या माध्यमातून नाटय़ात्मक पद्धतीने लोककला सादर करण्याच्या पद्धतीस भारुड असे म्हणतात. पूर्वीच्या काळी समाज अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेला होता. दारिद्रय़ आणि गरिबीचे अंधश्रद्धा हे प्रमुख कारण होते. द्रष्टय़ा संतांनी समाजातील या आंधळ्या भक्तीवर आपल्या लेखणीने कठोरपणे प्रहार केले. अभंग, ओवी आणि श्लोक आदी माध्यमातून संत आपल्या भावना, विचार व्यक्त करीत होतेच, पण समाजातील दांभिकपणा अथवा व्यंग दाखविण्यासाठी त्यांनी भारूड हा काव्यप्रकार वापरला. भारूड हा मूळ ‘बहुरूढ’ या शब्दावरून आला आहे. काळ बदलला तसे प्रबोधनाचे आणि मनोरंजनाचे स्वरूपही बदलले. भजनी, भारूड, गौळण या लोककला प्रकारातून सांस्कृतिक जडणघडण होताना समाजप्रबोधन होत होते. आजच्या काळातही अशा समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांची समाजाला गरज आहे. हे लक्षात घेऊन रेखा बेलपाठक त्यांच्या रेणुका कला मंचतर्फे ‘भक्तीरसाच्या कावडी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या सांस्कृतिक आक्रमणाच्या काळात लोककलेची ही परंपरा हरवून जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत. रेखा बेलपाठक यांच्यासह स्मिता खाडे, वर्षां सकपाळ, निलिमा म्हात्रे, राजश्री मुळकर, कवयित्री सुधा मोकाशी आणि विजया माणगावकर अशा महिला हा लोककलाप्रकार समाजात पोहोचवत आहेत. ‘भक्तिरसाच्या कावडी’ या आपल्या कार्यक्रमातून त्या गणेशस्तवन, दिंडी, वासुदेव, गोंधळ, रोडगा, जोगवा, फुगडी, दादला, जातं, विंचु, वाघ्या-मुरळी, महालक्ष्मी दर्शन अशा सर्व पारंपरिक प्रकारांचे सादरीकरण करतात. सामाजिक कार्य करणाऱ्या ठाणे शहर महिला मंडळातून रेखा बेलपाठक यांच्या या सांस्कृतिक कार्याला सुरुवात झाली. मंडळाच्या एका कार्यक्रमात रेखा बेलपाठक यांनी काही सहकारिणी भगिनींना एकत्र करून भारूडाचा कार्यक्रम बसवला. संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास करून प्रत्येक भारूडाच्या आधी निरूपण आणि नंतर दृकश्राव्य सादरीकरण अशा प्रकारे त्यांनी कार्यक्रमाची मांडणी केली. या कार्यक्रमाचे सादरीकरण लोकांना इतका आवडले की त्यानंतर कार्यक्रम सादरीकरणासाठी या समूहाला विविध संस्थांमधून निमंत्रणे येऊ लागली. कालांतराने या समूहाचे रेणुका कला मंच असे नामकरण करण्यात आले.
हौसेला अभ्यासाची जोड
रेखा बेलपाठक यांची अभ्यासू वृत्ती ‘भक्तिरसाच्या कावडी’ हा कार्यक्रम लोकप्रिय होण्याचे विशेष कारण ठरते. रेखा बेलपाठक यांनी त्यांचे वडील पांडुरंग काशिनाथ चिकटे यांच्याकडून नाटय़ आणि संगीताचे गुण घेतले आहेत. या कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी भजनी भारूड गाथाचे संकलन नेवासे येथून मिळवले आहे. एकनाथी भागवत, वृत्तपत्र, मासिकातून प्रसिद्ध झालेली कात्रणे, शंकर अभ्यंकरांनी लिहिलेली पुस्तके अशा प्रकारे सखोल अभ्यास करून त्यांनी या कार्यक्रमाची आखणी केली आहे. कार्यक्रमाचे लेखन, निर्मिती, निरूपण रेखा बेलपाठक यांचे स्वत:चे आहे. संगीत आणि अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे हा कार्यक्रम अतिशय समर्पक वाटतो. नाटय़ात्मक पद्धतीने सादरीकरण करताना तुळशी वृंदावन, झेंडे, पालखी, दिंडी, वासुदेवाचे नाचत येणे, तुणतुणे, टाळ, चिपळ्या अशा प्रकारचे दृश्य या भक्तिरसाच्या कावडी कार्यक्रमात साकारले जाते. यासोबतच सत्वर पाव ग आई, हा रोडगा, आई नवसाला पावली, दादला नको ग बाई, ज्ञानेश्वरांची गौळण असे सगळे भजन प्रकार या कार्यक्रमात सादर केले जातात.
भंपकपणाचा पंचनामा
रेणुका कला मंच या संस्थेच्या माध्यमातून विविध मंदिरे, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संस्था, ग्रंथालये आदी ठिकाणी भक्तिरसाच्या कावडी या कार्यक्रमाचे शेकडो प्रयोग झाले आहे. विशेष म्हणजे केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांनी भारूड सादर केले आहे. यंदा गुरुपौर्णिमेला संस्थेला साईबाबा संस्थानतर्फे शिर्डी येथे भारूड सादर करण्याची संधी मिळाली.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कला सादर करणे प्रतिष्ठेचे समजले जाते. ज्या काळात भारूड हा काव्यप्रकार जन्माला आला, त्या तुलनेत आताचा काळ बराच बदलला असला तरी सुधारणा होण्यास खूप वाव आहे. अजूनही समाजात मोठय़ा प्रमाणात अंधश्रद्धा आहे. भोंदू आणि स्वार्थी बाबा-बुवांचा सुळसुळाट आहे. समाजातील हा भंपकपणे चव्हाटय़ावर आणण्यासाठी भारूडासारखे चांगले माध्यम नाही. रेणुका कला मंचच्या कार्यक्रमांना मिळणारा रसिकांचा वाढता प्रतिसाद ही कला अद्याप कालबाह्य़ झालेली नाही, याचेच द्योतक आहे.