ठाणे : आपण यापूर्वीच एक मशीद गमावून बसलो आहोत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील इतर मशिदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणू इच्छित आहेत असा आरोप एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले

हेही वाचा – पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा

भिवंडी पश्चिम मतदारसंघात एमआयएमचे नेते वारिस पठाण हे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवैसी भिवंडीत आले होते. यावेळी त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. वक्फ विधेयक मंजूर झाल्यास भिवंडीतील मशीदे उद्ध्वस्त होतील. मदरसे बंद केले जातील. आपण यापूर्वी एक मशीद गमावली आहे. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा कायदा आणायचा आहे की, त्यातून त्यांना पूर्ण देशातील मशिदी उद्ध्वस्त करायच्या आहेत. त्यामुळे आता मुस्लिमांनी जागे व्हावे लागेल. ही लढाई आपल्याला लढायची आहे असे ओवैसी म्हणाले. जर या निवडणुकीत एमआयएमला मतदान झाले आणि आमचे उमेदवार निवडून आले तर आम्ही वक्फची संपत्ती वाचवू शकतो असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi bhiwandi constituency waris pathan campaign owaisi talk on mosque ssb