कल्याण- बदलापूर जवळील इंदगाव येथे साई बाबांचे अधिष्ठान चालविणाऱ्या रत्नाकार महाराज यांच्या साधना मठावर सात वर्षापूर्वी हल्ला केल्याप्रकरणी बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक कॅप्टन आशीष दामले (३५) यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश शौकत गोरवाडे यांनी दोषी ठरविले आहे. हल्लेखोरांमधील १८ जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
बेकायदा जमाव जमविणे, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणे, घुसखोरी, हल्ला करणे अशा गुन्ह्यांखाली कॅ. आशीष आनंद दामले यांना न्यायालयाने दोषी ठरविले. येत्या तीन वर्षाच्या काळात न्यायालय आदेश देईल ती शिक्षा कॅ. दामले यांना भोगायची आहे. यासाठी त्यांनी १५ हजार रुपयांचे हमीपत्र न्यायालयाला द्यायचे आहे. या कालावधीत सार्वजनिक शांततेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य त्यांनी करायचे नाही. साधना मठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मठाचे नियंत्रक नरेश विठ्ठल रत्नाकर यांना पाच लाखाची भरपाई द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संगीता फड यांनी काम पाहिले. कॅ. दामले यांना दिलेली शिक्षा कमीतकमी वाटत असल्याने ती अधिकाधिक दंडाची शिक्षा देण्याची मागणी ॲड. फड यांनी न्यायालयाकडे केली. कॅ. दामले हे राजकीय पदाधिकारी आहेत. त्यांच्या जवळील राजकीय वजन पाहता ते पुन्हा असा काही प्रकार करू शकतात, असे ॲड. फड यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. ॲड. दामले अमेरिकेतील ओरलॅन्डो येथील परवानाधारी व्यावसायिक पायलट आहेत.

Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
Delhi High Court
Delhi High Court : वकिलाकडून न्यायमूर्तीवर अपमानास्पद टिप्पणी; दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावली चार महिन्यांची शिक्षा
Sunil Shelke, Ajit Pawar NCP, Maval candidate MLA Sunil Shelke,
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्यावर गुन्हा; ‘हे’ आहे कारण
case registered against who sold clay pots by blocking road in kalyan
कल्याणमध्ये रस्ता अडवून मातीच्या कुंडी विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

हेही वाचा >>>ठाणे: चाकूचा धाक दाखवून महिलेला लुटले

विशेष सरकारी वकील ॲड. संगीता फड यांनी न्यायालयाला सांगितले, जून २०१५ मध्ये साधना मठाच्या आवारात वटपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू होता. महिला वर्ग अधिक संख्येने वडाच्या पुजेसाठी हजर होता. यावेळी मठामध्ये मुख्य नियंत्रक नरेश रत्नाकर, ओमकार रत्नाकर, स्मिता पटेल, पल्लवी असे उपस्थित होते. पूजाअर्चा आटोपल्यानंतर, गर्दी ओसरल्यानंतर रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान २० जणांचा जमाव मठावर चालून आला. त्याने दगडफेक, मठाचे मुख्य प्रवेशव्दार, त्याचे कुलुप तोडून मठात, सभागृहात प्रवेश केला. या जमावात राष्ट्रवादी काँग्रेसचे बदलापूर अध्यक्ष कॅ. आशीष दामले होते. हिंसक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न नरेश रत्नाकर, ओमकार यांनी केला. जमावातील काहींनी नरेश, ओमकावरवर हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. मठातील साहित्य, वाहनांची मोडतोड करण्यात आली. एक लाखाची वाहनावळ लुटून नेली.

हेही वाचा >>>ठाण्यात समूह विकास मार्गी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या प्रकल्पास प्रारंभ

मुख्य नियंत्रक नरेश रत्नाकार यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात कॅ. दामले व इतर १८ जणांविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कॅ. दामलेंसह १८ जणांना अटक केली होती. ॲड. फड यांनी आशीष यांच्यासह आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आशीष जमावाचे नेतृत्व करत नसले तरी ते जमावाचा एक भाग होते. हिंसक जमावाने केलेल्या प्रत्येक कृतीला त्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले. आरोपी पक्षांकडून आरोप फेटाळण्याचा प्रयत्न झाला.

या प्रकरणाचा तपास बदलापूर पोलीस ठाण्याचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी केला. नरेश रत्नाकार, त्यांचा मुलगा ओमकार, स्मिता पटेल, सुरज पाटील, नीतेश केणी, मयूर गायकवाड, अनिस शेख, अयुब शेख यांच्या साक्षी या प्रकरणात महत्वाच्या ठरल्या.

हरीश घाडगे, संतोष कदम, संकल्प लेले, वसंत लंघी, योगेश पाटील, उमेश लोखंडे, केतन शेळके, कौशल वर्मा, युवराज गीध, गणेश सोहनी, दीपक लोहिरे, पांडुरंग राठोड, राम लिहे, प्रज्वल तांबे, कुणाल राऊत, अमृत थोरात, धैर्यशील एजागज, हर्षल जाधव या हल्लेखोरांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे ॲड. ए. वाय. पत्की यांनी काम पाहिले