डोंबिवली- डोंबिवली एमआयडीसीतील खंबाळपाडा रस्त्यावरील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची मंगळवारी रात्री धारदार शस्त्राने अज्ञात चोरट्यांनी हत्या केली आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केली असण्याचा संशय मानपाडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारेकऱ्यांनी कंपनीतून दीड लाखाचे सामान चोरून नेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जसवंतसिंग रणबहादुर ठाकूर (५०) असे फिर्यादीचे नाव आहे. मरण पावलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव ग्यानबहादुर भीमबहादुर गुरुम (६४ ) असे आहे. खंबाळपाडा रस्त्यावरील चौधरी चाळ भागातील विजय प्राॅडक्ट पेपर कंपनीत ग्यानबहादुर नोकरीला होते. कंपनीतून कासा धातुचे गठ्ठे, ताबा धातुची वर्तुळे, पितळ, तांब्याचे तुकडे असा दीड लाख रुपये किमतीचा धातुचा साठा चोरट्यांनी चोरून नेला आहे.

ग्यानबहादुर मंगळवारी रात्री विजय पेपर कंपनीत तैनात असताना अज्ञात चोरट्यांनी कंपनीत चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. त्यांना सुरक्षा रक्षक ग्यानबहादुर यांनी कडवा प्रतिकार केला असावा, या वादातून चोरट्यांनी ग्यानबहादुर यांना एकट्याने गाठून धारदार, टणक हत्याराने त्यांच्या सर्वांगावार फटके मारून त्यांना गंभीर दुखापती केल्या. त्यांना जागीच ठार केले. मारल्यानंतर चोरट्यांनी ग्यानबहादुर यांचा मोबाईल, इतर धातुच्या वस्तू चोरून नेल्या.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.