अंबरनाथः अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे बालाजी किणीकर चौथ्यांदा विजयी झालेले आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना किणीकरांनी धुळ चारली. पक्षांतर्गत कुरबुरी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रचारात नसलेला सक्रीय सहभाग यामुळे किणीकर यांना धक्का बसतो की काय अशी चर्चा असताना किणीकर यांनी ५२ हजार ३९२ इतक्या विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दोन गट पहायला मिळत होते. आमदार बालाजी किणीकर यांच्याविरूद्ध माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर उघडपणे प्रतिक्रिया देत असल्याने पक्षात सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणली. त्यानंतर किणीकर यांनीही दिलगिरी व्यक्त करत वाळेकर गटाशी सामंजस्य ठेवण्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरही किणीकर यांच्या प्रचारात शिवसेनेचे सर्व गट दिसून आले नव्हते. मात्र एकनाथ शिंदे यांनी किणीकर यांसाठी सभा घेतली. त्यानंतर मतदारसंघातील चित्र बदलले. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात किणीकर यांच्यावर विरोधकांनी समाज माध्यमांवर विखारी टीका सुरू केली होती. त्यात गुप्तपणे प्रचारातही काही जण सक्रीय असल्याची चर्चा होती. मात्र किणीकर यांचा जनसंपर्क, सहजपणे उपलब्ध होण्याचे कौशल्य आणि शहरातल्या विविध भागातील हितचिंतक यांनी किणीकर यांना साथ दिली. त्यामुळे किणीकर यांना १ लाख ११ हजार ३६८ मते मिळाली. तर विरोधी उमेदवार राजेश वानखेडे यांना ५९ हजार ९९३ मते मिळाली. किणीकर यांचा हा विक्रमी विजय मानला जातो आहे.