कल्याण: कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणुकीसाठी या चारही मतदारसंघातील नागरिकांनी बुधवारी सकाळपासून मतदान केंद्रांबाहेर स्वयंस्फूर्तीने रांगा लावल्या होत्या. या रांगांमध्ये ज्येष्ठ नागरिक, वृध्द, कामावर जाणाऱ्या नोकरदारांचा सर्वाधिक सहभाग होता. महिला वर्गाची रांगेतील हजेरी लक्षणीय होती. मतदान केंद्र परिसर, उमेदवारांचे मतचिठ्ठी देण्याचे मंच याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदारांना आपल्या बाजुने वळविण्यासाठीच्या प्रकारांना आळा बसला होता.

कल्याण पश्चिमेत उंबर्डे भागातील पुण्योदय पार्क परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थकांनी मतचिठ्ठी देण्यासाठी मंच लावला होता. या भागात महायुतीचा वरचष्मा आहे. आपल्या भागात आघाडीच्या उमेदवाराचा मंच कसा लागला, असा प्रश्न महायुतीच्या एका कार्यकर्त्याने करून आघाडीच्या कार्यकर्त्याला मंच लावण्यास विरोध करून त्याला शिवीगाळ केली. यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांच्या मध्यस्थीने हा विषय तात्काळ मिटविण्यात आला. आघाडीच्या उमेदवाराला तेथे मंच लावण्यास परवानगी देण्यात आली.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
dharmarajya party agitation against evm in thane
ईव्हीएम यंत्राविरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरूवात; शहरातील चौका-चौकात ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न

हेही वाचा >>>बदलापूर चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचे ताशेरे, ‘सीआयडीला गांभीर्य नाही’

डोंबिवली पश्चिमेत राजूनगर परिसरात एक माजी नगरसेवक आणि एक स्थानिक कार्यकर्ता यांच्यात बाचाबाची झाली. भाजपच्या वरिष्ठाने या प्रकरणात मध्यस्थी करून या प्रकरणावर पडदा टाकला. ग्रामीणमधील दातिवली भागात दोन गटात बाचाबाची झाल्याची चर्चा होती. राजकीय चढाओढीतील हे किरकोळ प्रकार वगळता कल्याण, डोंबिवली परिसरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्र परिसरात मतदारांना कोणी कसलेही आमिष दाखविणार नाही याची विशेष काळजी पोलिसांनी घेतली होती.

ज्येष्ठांचे सकाळीच मतदान

मतदानाच्या पाच दिवस अगोदर भारतीय निवडणूक आयोग, पक्षीय उमेदवारांकडून मतदारांना घरपोच आपल्या मतदान केंद्राचे ठिकाणाची माहिती व्हाॅटसप, मतचिठ्यांमधून दिली होती. त्यामुळे मतदार स्वयंस्फूर्तीने घरातून बाहेर पडून मतदान केंद्रावर येत होते. सकाळी सात वाजल्यापासून वृध्द, ज्येष्ठ नागरिक, कामावर जाणारे नोकरदार मतदानासाठी रांगेत होते. मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मतदान केल्यानंतर मतदार केंद्राजवळील सेल्फी केंद्रात सेल्फी काढत होते. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती तरी अनेक जण मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन आले होते. मतदान केंद्रांबाहेर वृध्द, ज्येष्ठ नागरिक यांना पाणी, आसन व्यवस्थेची सोय करण्यात आली होती.

हेही वाचा >>>डोंबिवलीत सागाव येथे डॉक्टरला चार जणांची मारहाण

अमेरिकन काॅर्पोरेटचे मतदान

नोकरीनिमित्त अमेरिकेत राहत असलेल्या काॅर्पोरेट अपूर्वा पांडे दोन दिवसापूर्वी डोंबिवलीत दाखल झाल्या आहेत. डोंबिवली पूर्वेतील मतदार यादीत नाव असल्याने अपूर्वा यांनी सावरकर रस्त्यावरील संगीता विद्यामंदिरात मतदान केले.

गस्तीमुळे शांतता

मतदानासाठी सुट्टी असल्याने बहुतांशी नोकरदार रांगेत तिष्ठत राहून मतदान करण्यास लागू नये म्हणून सकाळीच मतदानासाठी कुटुंबीयांसह बाहेर पडला होता. काही मतदार कौतुकाने आपली लहान मुले, पाळीव श्वान घेऊन मतदान केंद्र परिसरात आले होते. दुपारनंतर मतदान केंद्रावरील मतदान यंत्र संथगतीने काम करत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून वाढल्या होत्या. त्यामुळे मतदान केंद्रांबाहेरील रांगाचे प्रमाण वाढले होते. मतदान केंद्रांवर महिला, वृध्द, ज्येष्ठ यांना प्रथम प्राधान्य देऊन मतदान करून दिले जात होते. कल्याण ग्रामीणमधील लोकग्राम भागात रस्त्यावर एका उमेदवाराचा चार आकडा लिहून प्रचार करण्यात येत होता. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तो क्रमांक पुसून काढला.मतदान केंद्रात येणाऱ्या मतदाराकडील मतचिठ्ठीवर कोणत्याही पक्षाचे चिन्हे नाही याची खात्री करून मगच पोलीस त्यांना मतदानासाठी केंद्रात प्रवेश देत होते.

उमेदवार मतदारसंघात

कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण, डोंबिवलीतील उमेदवार मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे ना. मतदार कार्यकर्त्यांकडून मतदानासाठी घराबाहेर काढले जात आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी आपल्या मतदारसंघात समर्थकांसह फिरत होते. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचे भोजन, त्यांच्या पाण्यासाठी यावेळी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. लोकसभेसारखी परिस्थिती यावेळी निर्माण होऊ नये याची विशेष काळजी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली होती.

Story img Loader