ठाणे – विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यावर लावण्यात येणारी ओळख शाई पाण्याने धुतली असता, पुसट होत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून करण्यात आल्या. ठाणे जिल्हा विधानसभा मतदारसंघातील कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर, अंबरनाथ, नवी मुंबई आणि मुरबाड मतदारसंघातील अनेक मतदारांच्या बोटावरील शाई पुसट झाल्याची बाब मतदारांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितली.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधुम बुधवारी सर्वत्र पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीच्यावेळी मतदार याद्यांमधून मतदारांची नावे गायब होणे, मतदानकेंद्र बदलणे, तसेच काही तांत्रिक अडचणी, अशा अनेक समस्यांना मतदारांना सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीतही असाच काहीसा प्रकार झाला. अशातच मतदान केल्यावर ओळख म्हणुन लावण्यात येणारी बोटावरील शाई पाणी लागल्यास पुसट होत असल्याची बाब मतदार प्रदीप गुजर यांनी लोकसत्ताला सांगितली. गुजर हे सकाळी त्यांच्या मतदरसंघातील मतदान केंद्रावर मतदान करण्यास गेले होते. मतदान करून घरी आल्यावर त्यांनी आपले हात पाण्याने धुतले. बोटावरील शाईला पाणी लागल्याने ती पुसट होत असल्याचे त्यांना आढळले. शाई पुसली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी ही बाब लोकसत्ता प्रतिनिधींना सांगितली. या प्रकाराबाबत इतर मतदारसंघात पाहणी केली असता, असाच प्रकार ठाणे शहर मतदारसंघाबरोबरच कोपरी पाचपाखाडी, अंबनाथ, मुरबाड, नवी मुंबई मतदारसंघातील मतदारांना असाच अनुभव आल्याचे चित्र होते. याप्रकरणी मतदारांना विचारणा केली असता नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी ही बाब सांगितली.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Jitendra Awhad vs Dhananjay Munde
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
Central Election Commissioner refutes opposition allegations no discrepancy in counting of ballot papers
मतपावत्यांच्या मोजणीत विसंगती नाही! विरोधकांच्या आरोपांचे केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडून खंडन

हेही वाचा >>>डोंबिवलीत गावठी मद्य विक्रेत्यांवर पोलिसांच्या धाडी

तर याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

मतदान केल्यावर अनेक आठवडे बोटावरील शाई असते. विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यावर लावण्यात आलेली शाई काही वेळातच पुसट झाली.- सरिता मांडावकर, मतदार

बोटावर लावण्यात येणार शाई ही पक्की असते. अशा प्रकारे शाई जाणे शक्य नाही. आम्ही जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता मतदारांच्या बोटांवरील शाई पुसट होणे अथवा निघून जाणे असे कोणतेही प्रकार आढळून आलेले नाही.- उर्मिला पाटील, उपविभागीय अधिकारी, ठाणे

Story img Loader