ठाणे – विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवत, मला विजयी केले. त्यामुळे ठाणेकरांना मी वचन देतो की, लोकसहभागातुन विकसित ठाण्याचे स्वप्नपूर्ण करेन असे आश्वासन भाजप नेते संजय केळकर यांनी दिले. विधानसभा ठाणे शहर मतदारसंघात ७४ हजाराहून अधिक मतांची मिळाली असून विजय निश्चित असल्याने केळकर त्यांच्या काऱ्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू  होता त्यावेळी ते बोलत होते. 

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे संजय केळकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव अशी तिरंगी लढत पाहायला मिळत होती. महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी आठव्या फेरीच्या अखेरीस ७४ हजाराहून अधिक मते मिळवली असताना भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केळकर यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा केला. लाडक्या बहिणींनी आर्शिवाद देत मला निवडून आणले तसेच लाडक्या भावाला ओवाळणी घातली आहे. तिसऱ्यांदाही ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला विजयी केले. त्यामुळे मी वचन देतो की, लोकसहभागातुन विकसित ठाण्याचे स्वप्नपूर्ण करेन असे आश्वासन भाजप नेते केळकर यांनी ठाणेकरांना दिले. या जल्लोषावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा देत, फुलांची उधळण तसेच ढोल – ताशांच्या गजरात आनंद साजरा केला.

Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Story img Loader