ठाणे – विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवत, मला विजयी केले. त्यामुळे ठाणेकरांना मी वचन देतो की, लोकसहभागातुन विकसित ठाण्याचे स्वप्नपूर्ण करेन असे आश्वासन भाजप नेते संजय केळकर यांनी दिले. विधानसभा ठाणे शहर मतदारसंघात ७४ हजाराहून अधिक मतांची मिळाली असून विजय निश्चित असल्याने केळकर त्यांच्या काऱ्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू होता त्यावेळी ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे संजय केळकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव अशी तिरंगी लढत पाहायला मिळत होती. महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी आठव्या फेरीच्या अखेरीस ७४ हजाराहून अधिक मते मिळवली असताना भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केळकर यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा केला. लाडक्या बहिणींनी आर्शिवाद देत मला निवडून आणले तसेच लाडक्या भावाला ओवाळणी घातली आहे. तिसऱ्यांदाही ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला विजयी केले. त्यामुळे मी वचन देतो की, लोकसहभागातुन विकसित ठाण्याचे स्वप्नपूर्ण करेन असे आश्वासन भाजप नेते केळकर यांनी ठाणेकरांना दिले. या जल्लोषावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा देत, फुलांची उधळण तसेच ढोल – ताशांच्या गजरात आनंद साजरा केला.