दत्तात्रय भरोदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शहापुर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार दौलत दरोडा यांचा निसटता विजय झाला. येथील निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी दरोडा यांना विजयी घोषित केले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा यांचा अवघ्या १६७२ मतांनी पराभव केला.
दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे होते. त्या दोघांमध्येच खरी लढत होती. दरोडा यांना ७३ हजार ८१ व बरोरा यांना ७१ हजार ४०९ एवढी मते पडली. मात्र जिजाऊ विकास पार्टीच्या अपक्ष उमेदवार रंजना उघडा यांनी रंग भरला होता. त्यांना ४२ हजार ५०८ एवढी मते पडली. या मतदार संघात नोटा ला चार हजार ८४४ एवढी मते पडली.
सकाळी आठ वाजता मतमोजणी ला सुरुवात झाली. मतमोजणी च्या पहिल्या फेरी पासूनच महायुतीचे उमेदवार दरोडा यांनी घेतलेली आघाडी मधल्या दोन – तीन फेऱ्या वगळता शेवटापर्यंत कायम होती. नोटा ला मिळालेल्या मतांचा फटका बहुधा बरोरा याना बसला असावा.