डोंबिवली – मागील १५ वर्ष डोंबिवली शहरावर आपली हुकमत कायम ठेवणाऱ्या भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी यंदा चौथ्यांदा ७६ हजार ८९६ मताधिक्य मिळवून डोंबिवली शहरावरील स्वतासह भाजपचे वर्चस्व कायम ठेवले. लोकसभा निवडणुकीपर्यंत एका व्यासपीठावर फिरणारे आणि एकमेकांचे गुणगान गाणारे महायुतीमधील मंत्री रवींद्र चव्हाण, माजी सभापती दीपेश म्हात्रे विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले. नागरी समस्या, विकास कामांच्या विषयावर विविध प्रश्न उपस्थित करून म्हात्रे यांनी चव्हाण यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पंधरा वर्ष डोंबिवली शहरात आपली मतदारांपर्यंत पाळेमुळे घट्ट रोवलेल्या चव्हाण यांनी दीपेश यांचे आव्हान मोडून काढत शहरावरील आपले नेतृत्व कायम ठेवण्याची परंपरा अबाधित ठेवली.

आपला विजय हा एका विचारधारेचा, महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या एकजुटीचा, लाडक्या बहिणींनी दिलेल्या साथीचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासाचा विजय असल्याची प्रतिक्रया सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विजयानंतर माध्यमांना दिली. चव्हाण यांना एक लाख २३ हजार ४२७, तर दीपेश यांना ४६ हजार ५३१ मिळाली. विजयानंतर मंत्री चव्हाण यांची कार्यकर्त्यांनी सावळाराम क्रीडासंकुल ते गणेश मंदिर भव्य मिरवणुक काढली.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Who is George Soros
जॉर्ज सोरोस कोण आहेत? भाजपला त्यांच्याविषयी इतका राग का? ते खरेच ‘काँग्रेसमित्र’ आणि ‘भारतशत्रू’ आहेत का?
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात महायुतीचा वरचष्मा; १८ पैकी १६ जागांवर महायुतीचा विजय

डोंबिवली विधानसभेचा उमेदवार, भाजपचा स्टार प्रचारक आणि स्वताच्या डोंबिवली मतदार संघाबरोबर पालघरसह कोकणातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी मंत्री चव्हाण यांच्यावर होती.

मंत्री चव्हाण यांच्या गेल्या पंधरा वर्षातील विकास कामांच्या विषयावर प्रश्न उपस्थित करत स्वपक्ष, परिवारातील काही मंडळींनी चव्हाण यांच्या विरोधात, काहींनी उघडपणे काम केल्याच्या तक्रारी होत्या. शिवसेनेतील काही दिग्गज नगरसेवक, पक्षीय भेद विसरून चव्हाण यांनी डोंबिवली पश्चिमेतील काही नगरसेवकांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. यामधील बहुतांशी मंडळींनी निवडणुकीच्या तोंडावर चव्हाण यांना शब्द देऊन नंतर दीपेश म्हात्रे यांचे काम केले असल्याची चर्चा होती.

हेही वाचा >>>अंबरनाथमध्ये बालाजी किणीकर चौथ्यांदा विजयी; ५१ हजार मतांनी ठाकरे गटाच्या वानखेडेंचा पराभव

डोंबिवली पश्चिमेतील आगरी बहुल नगरसेवक, समाज दीपेश यांना तगडी साथ देत असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. दीपेश यांचे सर्व कुटुंबीय, वर्षानुवर्ष एकमेकांच्या घरांचा उंबरा न ओलांडणारे चव्हाण यांच्या विरोधासाठी केवळ दीपेश यांना सामील झाले होते. कोकणी पट्ट्यातील मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. या सगळ्या आव्हानाला तोंड देत मंत्री चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुप्तपणे प्रचार प्रवाहीत ठेऊन कुठेही आपल्याकडून आगळीक होणार नाही याची काळजी घेतली.

या पार्श्वभूमीवर दीपेश यांच्या कार्यकर्त्यांकडून चव्हाण यांच्या विषयीच्या विविध दृश्यध्वनी चित्रफिती समाज माध्यमात प्रसारित करून त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. त्याचा सयंतपणे भाजप कार्यकर्त्यांनी सामना केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात ठेच लागलेला मतदार यावेळी संघटित करण्यात महायुतीचे कार्यकर्ते यशस्वी झाले. डोंबिवली भाजप, संघ परिवाराचा बालेकिल्ला. हा एकगठ्ठा मतदार सुरक्षित ठेवण्यात भाजपची तरूण फळी, महायुतीचे कार्यकर्ते यशस्वी झाले. आता फसलात तर पुढे बुडालात, असा सुप्त प्रचार महायुतीकडून सुरू होता. लोकसभा निवडणुकीनंतर समाज माध्यमांतील विशिष्ट ध्वनीचित्रफिती पाहून हिंदू मतदार एकटवला. या सगळ्या ताकदीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ८६ हजारापर्यंत मतदान असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी एक लाख २३ हजाराचा पल्ला गाठून होय हिंदुत्वासाठी जिंकलो हे दाखवून दिले आहे.

Story img Loader