लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे : भिवंडी येथील कामतघर परिसरात मंगळवारी सकाळी अतिक्रमणावर कारवाई करित असल्याच्या रागातून महापालिकेचे साहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे यांना तीन जणांनी धक्काबुक्की करत महापालिका पथकाच्या वाहनावर दगडफेक केली. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-शिंदे गटाच्या कंटेनर शाखेला बेकायदेशीर वीज, अदानी वीज समुहाने वीज जोडण्या केल्या खंडीत

भिवंडी येथील कामतघर ते ताडाळी परिसरात मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी भिवंडी महापालिकेचे साहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे हे पथकाला घेऊन गेले होते. कामतघर परिसरात एका दुकानावर कारवाई करत असताना एका व्यक्तीने सोमनाथ सोष्टे यांना धक्काबुक्की केली. येथे मोठ्याप्रमाणात जमाव जमल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने महापालिकेच्या जेसीबीवर दगडफेक केली. यात कुणीही जखमी झालेले नाही. तर तिसऱ्याने पथकाला शिवीगाळ केली. या घटनेप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे बीट निरीक्षक संदीप जाधव यांनी तक्रार दाखल केली असून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.