लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: भरधाव वेगात निष्काळजीपणे टेम्पो चालविताना चालकाला समोरील गतिरोधक लक्षात आला नाही. गतिरोधकावरुन टेम्पो जात असताना चालकाने जोराने ब्रेक लावल्याने टेम्पो पलटी झाला. टेम्पोतील वाहन साहाय्यक टेम्पोच्या दरवाज्यातून बाहेर फेकून टेम्पोखाली आल्याने त्याचा जागाची मृत्यू झाला.

One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Vasai alarm ATM center, alarm ATM, Vasai,
एटीएम केंद्रातील अलार्मचा ५ तास नागरिकांना मनस्ताप

कल्याण मधील खडकपाडा सर्कल जवळील गुरुदेव हाॅटेल परिसरातील रस्त्यावर गुरुवारी सकाळी ही घटना घडली. टेम्पो चालक बिलाल शेख (३२, रा. चोपडा कोर्ट, उल्हासनगर) यांच्या निष्काळजीपणामुळे वाहन साहाय्यक शोयबउल्ला शेख याचा मत्यू झाला. मयत शोयबउल्लाचा भाऊ सोफिउल्ला शेख (रा. उल्हासनगर) याच्या तक्रारीवरुन महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी टेम्पो चालक बिलाल विरुध्द गुन्हा दाखल केला.

हेही वाचा… डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्या जलमय, उंचवट्या काँक्रीट रस्त्यांचा उद्योजकांना फटका

पोलिसांनी सांगितले, टेम्पो चालक बिलाल गुरुवारी सकाळी भरधाव वेगात वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत टेम्पो चालवत बिर्ला महाविद्यालय दिशेने उल्हासनगरकडे जात होते. यावेळी त्यांच्या सोबत वाहन साहाय्यक शोयबउल्ला शेख होता. कल्याण शहर परिसरातील मटण विक्रेत्यांना कोंबडी पुरवठ्याचे काम टेम्पोतून केले जाते. गुरुवारी मुसळधार पाऊस सुरू असताना टेम्पो चालक भरधाव वेगात टेम्पो चालवत उल्हासनगर दिशेने जात होता.

हेही वाचा… डोंबिवलीतील तीन जणांची रिक्षा चालकाच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता, कल्याण जिल्हा न्यायालयाचा निर्णय

खडकपाडा सर्कलजवळील गुरुदेव हाॅटेल भागातील रस्त्यावरुन जात असताना या रस्त्यावरील गतिरोधक चालक बिलालच्या लक्षात आला नाही. गतिरोधकावर वाहन चढताच चालक बिलालने जोरात ब्रेक लावल्याने टेम्पो जोराने उडाला. टेम्पोचा दरवाजा उघडून साहाय्यक शोयबउल्ला बाहेर फेकला गेला. त्याचवेळी टेम्पो पलटी झाला. शोयबउल्ला टेम्पोच्या खाली आल्याने त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला.
टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.