डोंबिवलीत अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत पार्थिव घेऊन गेलेल्या नातेवाईकाला कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याची आणि अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना डोंबिवली जवळील घारीवली गावात घडली. याप्रकरणी पाच आरोपींविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुनाथ पाटील, बाळकृष्ण पाटील, सुनील पाटील, सुभाष पाटील, कुसुम पाटील (सर्व रा. घारीवली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं?

घारीवली गावात तक्रारदार सचिन पाटील (४२) हे कुटूंबासह राहतात. त्यांचे चुलते केशव पाटील यांचे निधन झाले होते. त्यामुळे नातेवाईकांनी त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घारीवली गावातील पाण्याच्या टाकी शेजारी असलेल्या स्माशनभूमीत नेले. याठिकाणी पाचही आरोपींनी आमची जागा आहे असे म्हणत स्माशनभूमीत पार्थिव दहनाला मनाई केली आणि सचिन पाटील यांच्याशी वाद घातला.

हेही वाचा : उल्हासनगर: शिवसेना नगरसेवकाच्या अंत्ययात्रेत तलवारीने हल्ला, दोघे गंभीर जखमी

यानंतरही मृतदेहावर अंत्यविधी करत असताना पाहून आरोपींनी कुऱ्हाड आणि लोखंडी कोयते हातात घेऊन सचिन पाटील व त्याचा भाऊ दोघांवरही धावून गेले. यावेळी अंत्यविधीसाठी आलेल्या इतर नागरिकांनी हे पाहून स्माशनभूमीतून पळ काढला. त्यानंतर सचिन व त्यांच्या भावाला पाचही आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली.

Story img Loader