भिवंडी येथील भोईवाडा भागात वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकू हल्ला झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सुजीत कनोजिया (३४) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या मंगल सरोज (२२) याला अटक केली आहे.

हेही वाचा- शहापूर : अल्पावधीत प्रसिद्धी मिळालेल्या गायकाचा विजेच्या झटक्याने मृत्यू

सुजीत कनोजिया हे जलवाहिनी दुरुस्तीचा व्यवसाय करत असून बुधवारी रात्री ११.३० वाजता ते भोईवाडा येथील नालापार परिसरात कामानिमित्ताने जात होते. त्यावेळी दोनजण एका व्यक्तीला मारहाण करत होते. हा वाद मिटविण्यासाठी सुजीत गेले असता, एकाने त्यांच्या छातीवर चाकूने वार केला. या हल्ल्यात सुजीत गंभीर जखमी झाले. या घटनेप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मंगल सरोज याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच सुजीतवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader