डोंबिवली-  येथील पश्चिम डोंबिवलीतील भावे सभागृहाजवळ असलेल्या शिवसेनेच्या( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेतील शाखाप्रमुखावर चार अनोळखी इसमांनी रविवारी संध्याकाळी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. राजेश बाळाराम पाटील (५०) असे हल्ला झालेल्या  तक्रारदार शाखाप्रमुखाचे नाव आहे. त्यांनी या संदर्भात विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा >>> गेमच्या माध्यमातून कथित धर्मांतर प्रकरण; ठाणे पोलिसांकडून एकजण ताब्यात

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!

सेवानिवृत्त असलेले राजेश पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक शाखाप्रमुख म्हणून काम पाहतात. रविवारी संध्याकाळच्या सुमारास राजेश पाटील शाखेत बसलेले असताना त्यांच्या शाखेसमोर वाहनांची गर्दी होती. शाखेच्या बाहेर एक अनोळखी इसम रस्त्यावर त्याच्या मोबाईलवर बोलत होता. राजेश पाटील यांनी त्याला रस्त्यावरून गाडी बाजूला घेऊन फोनवर बोल, अशी विनंती केली. या बोलण्यावर संतापलेल्या सदर इसमाने तू मला विचारणारा कोण ? असा सवाल करत शिवगाळ केली. इसम त्याच्या तीन साथीदारांना घेऊन शाखे जवळ आला. या चौघांनी मिळून शाखाप्रमुख राजेश पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांचे कपडे फाडून टाकले. या मारहाणीत शाखाप्रमुख राजेश पाटील यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मारहाण केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. विष्णूनगर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Story img Loader