वर्तकनगर येथील समतानगर भागात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्याला दुकानातील कर्मचाऱ्याने शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात बलाराम देवासी (२४) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>ठाणे: इंधन दरवाढ आणि कच्चा मालाच्या किंमतीमुळे धुलिवंदनचा रंग फिका; रंग, पिचकारीच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ

thane traffic police
ठाणे: वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..
E-waste transportation, Navi Mumbai,
नव्या वर्षापासून ई-कचरा वाहतूक, ९०८ कोटींच्या कचरा संकलन कामाचाही प्रारंभ

ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने शहरात बंदी असलेल्या प्लास्टिक वापर आणि विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार या विभागाचे उपमुख्य स्वच्छता निरीक्षक हेमंत चौधरी, स्वच्छता निरीक्षक समीर डोळे आणि प्रभारी स्वच्छता निरीक्षक दिपेश मंत्री हे समतानगर भागात करवाईसाठी गेले होते. त्यावेळेस पथकभैरूभवानी सुपर मार्केट या दुकानात गेले. दुकानात प्लास्टिकच्या पिशव्या तसेच इतक प्लास्टिकचे साहित्य आढळून आले. त्यामुळे पथक जप्तीची कारवाई करत असताना दुकानातील कर्मचारी बलाराम देवासी हा त्यांच्यासोबत वाद घालू लागला. त्यानंतर त्याने पथकाला शिवीगाळ, धक्काबुक्की केली. या दरम्यान हेमंत यांच्या डोळ्याजवळ मार लागला. त्यानंतर पथकाने पास्टिक साहित्य जप्त करण्यासाठी सफाई कर्मचारी उस्मान खान आले असता, त्यांनाही देवासीने मारहाण केली. याप्रकरणी हेमंत यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.