कल्याण- टिटवाळ्यातील वासुंद्री रस्त्यावर नारायण निवास मध्ये राहणाऱ्या एका महिला आणि तिच्या दोन लहान मुलींना घरात बंदिस्त करुन तिच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांना घरात जिवंत जाळण्याचा प्रकार बुधवारी रात्री मांडा टिटवाळा येथे घडला. या घराच्या आजुबाजुला असलेल्या रहिवाशांच्या घरांना मारेकऱ्यांनी कड्या लावल्या होत्या. त्यामुळे हे रहिवासी घरात कोंडून राहिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील- भास्कर जाधव

हेही वाचा >>> डोंबिवलीत राजकीय रण पेटले; मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप

महिलेने बंदिस्त घरातून ओरडा केल्यानंतर परिसरातील रहिवासी रात्री दीड वाजता जागे झाले. त्यांना योगेश पाटील यांच्या घराला आणि घरा समोरील रिक्षेला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी महिलेच्या घराच्या दरवाजाला बाहेरुन लावलेली कडी काढून तिला आणि तिच्या मुलींना सुखरुप बाहेर काढले. ही महिला आणि तिच्या आठ आणि दोन वर्षाच्या मुली धुराने कोंडून गुदमरल्या होत्या. शेजारील घरांच्या दरवाजांना बाहेरुन कड्या लावण्यात आल्याने तेही घराबाहेर पडणार नाही अशी व्यवस्था मारेकऱ्यांना केली होती.

हेही वाचा >>> रेटींग देण्याचे काम पडले महागात; आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची २७ लाख रूपयांना फसवणूक

पोलिसांनी सांगितले, योगेश पाटील (३६) हे टिटवाळ्यात वासुंद्री रस्त्यावर नारायण निवास मध्ये पत्नी, दोन मुलीसह राहतात. योगेश हे शहाड येथील सेंच्युरी रेयाॅन कंपनीत कामाला आहेत. योगेश आणि मांडा गावातील लालचंद पाटील, बबलेश पाटील, नरेश पाटील, आशिष पाटील यांच्यात जमिनीवरुन वाद सुरू आहेत. आठ वर्षापूर्वी पाटील बंधूंनी योगेशना मारहाण केली होती. तेव्हापासून त्यांच्यात धुसफूस सुरू आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली : लोढा हेरिटेजमध्ये पेट्रोल चोरी करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला रहिवाशांनी पकडले

बुधवारी योगेश रात्रपाळी कामासाठी कंपनीत गेले. घरी पत्नी दोन लहान मुली होत्या. त्यानंतर रात्री दीड वाजता घराच्या खिडकी जवळ बोलण्याचा आवाज आला त्यावेळी योगेशची पत्नी दीपाली हिने घरातील वीज प्रवाह सुरू केला. तिला खिडकीतून आरोपी लालचंद, बबलेश, नरेश, आशिष हे तेथून हातात ड्रम, बोळे घेऊन पळताना पाहिले. आरोपींनी जमिनीच्या वादातून योगेशवर राग काढण्यासाठी त्याच्या घरावर पेट्रोल टाकून त्याच्या कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. घरासमोरील योगेश यांची रिक्षा जाळून टाकण्यात आली. जमिनीच्या वादातून आपल्या कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्या बद्दल योगेशने यांनी आरोपी विरुध्द टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप देशमुख तपास करत आहेत.