लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे आणि ऐरोली दोन स्थानकांच्या दरम्यान नव्याने तयार करण्यात आलेल्या दिघा गाव या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या हस्ते आज सायंकाळी करण्यात येणार आहे. परंतु त्यापूर्वीच खासदार राजन विचारे यांनी स्थानकाच्या उद्घाटनाचा प्रयत्न केला. ठाकरे गट थेट स्थानकात शिरले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठाणे ते ऐरोली दोन स्थानकादरम्यान दिघा गाव हे स्थानक तयार करण्यात आले आहे. हे स्थानक खासदार राजन विचारे यांच्या मतदार संघात आहे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्थानकाचे उद्घाटन केले जाणार आहे. स्थानिक खासदार असूनही स्थानकाच्या उद्घाटन निमंत्रण पत्रिकेत राजन विचारे यांचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

आणखी वाचा-ठाणे : अटल सेतू, दिघा स्थानकाच्या कार्यक्रम पत्रिकेतून खासदार राजन विचारे यांचे नाव वगळले

गेल्या काही दिवसांपासून दिघा स्थानक सुरू व्हावे यासाठी अजून विचारे पाठपुरावा करत होते. शुक्रवारी दुपारी राजन विचारे यांनीच स्थानकाच्या उद्घाटनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ढोलताशे घेऊन ठाकरे गट स्थानकात शिरले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते स्थानकात मोदी यांचा कार्यक्रम पाहत होते. दोन्ही गट समोरासमोर आले आहेत.

Story img Loader